महाराष्ट्र

maharashtra

कोकणात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल

By

Published : Jul 11, 2020, 6:49 PM IST

२०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी येथे ब्लॅक पँथरला वनविभागाने जीवदान दिले होते. विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरला वाचवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले होते.

black-panther-seen-at-kokan-video-goes-viral
ब्लॅक पँथर

रत्नागिरी-अत्यंत दुर्मिळ आणि वन्यप्राण्यांमध्ये गणना होणाऱ्या बगीरा अर्थात ब्लॅक पँथरचे दर्शन सध्या कोकणात होत आहे. जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे इथे अनेक ग्रामस्थांना हा ब्लॅक पँथर निदर्शनास आला आहे. याबाबतचा एका व्हिडिओ सध्या सोशल मिडियावरून व्हायरल झाला आहे.

ब्लॅक पँथर

२०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी इथे ब्लॅक पँथरला वनविभागाने जीवदान दिले होते. विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरला वाचवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले होते. त्यानंतर मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले नव्हते. कोंडीवरेच्या जंगलात दिसणारा तो प्राणी ब्लॅक पँथरच असल्याचा दुजोरा आता वनविभागानेही दिला आहे. ब्लॅक पँथर ही बिबट्याची जात आहे. पूर्णतः काळा रंग असणाऱ्या या दुर्मिळ वन्यजिवाचे पुन्हा दर्शन झाल्याने पर्यावरण प्रेमींसाठीही आनंदाची बातमी असणार आहे.

ब्लॅक पँथर ज्या भागात आढळला आहे. त्या विभागात आता वनविभागाकडून कॅमेरे लावण्यात येणार असून त्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details