महाराष्ट्र

maharashtra

कोंडीचा धबधब्यावरील दगड आता फोडणार वाघाची डरकाळी

By

Published : Jun 10, 2021, 4:53 PM IST

खानाव येथील महेंद्र गावंड हा चित्रकार आणि वाळू शिल्पकार असून त्याने कोंडीचा धबधबा येथील दगडावर कलाकृती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने आधीच वाघाच्या तोंडाच्या आकाराचा दगड तयार झालेला आहे. या दगडाला आपल्या सहकार्याच्या साहाय्याने महेंद्र याने रंगरंगोटी करून सुंदर असे वाघ डरकाळी फोडतानाची कलाकृती साकारली आहे.

दगडावर वाघाचे चित्र आकारले
दगडावर वाघाचे चित्र आकारले

रायगड - पावसाळा सुरू झाला की रायगडातील धबधबे पाण्याने ओसंडून वाहू लागतात. त्यामुळे पर्यटकांची पाऊले आपोआप या धबधब्याकडे वळतात. अलिबाग तालुक्यातील बेलोशी सागवाडी आदिवासी वाडीवर कोंडीचा धबधबा आहे. या धबधब्याच्याठिकाणी मोठमोठे दगड आहेत. यातील एका दगडाला खानाव येथील चित्रकार महेंद्र गावंड याने वाघ डरकाळी फोडतानाची कलाकृती साकारली आहे. त्यामुळे कोंडीचा धबधब्यावरील दगडही आता डरकाळी फोडणार आहेत. गावंड याने साकारलेली ही कलाकृती 'सेल्फी पॉईंट' म्हणून प्रसिद्ध होऊ शकते.

धबधब्यावरील दगड आता फोडणार वाघाची डरकाळी

जिल्ह्यात पावसाळी पर्यटन जोरात

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असते. पावसाळ्यात ठिकठिकाणी नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत असतात. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र तसेच देशातील परदेशातील पर्यटक रायगडला धबधब्यावर आनंद लुटण्यास येत असतात. नैसर्गिक पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात पर्यटक आनंद घेतात. अलिबाग तालुक्यातही कुर्डुस, कार्लेखिंड, राम धरणेश्वर, सिद्धेश्वर, कोंडीचा धबधबा तसेच अनेक छोटे मोठे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करीत असतात. यातून स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळत असतो.

कोंडीचा धबधबा निसर्गाने नटलेला

अलिबाग तालुक्यातील बेलोशी सागवाडी आदिवासी वाडीवरून दहा पंधरा मिनिटांवर कोंडीचा नैसर्गिक धबधबा आहे. हा धबधबा बारमाही वाहत असतो. या धबधब्या ठिकाणी अनेक मोठमोठे दगड विखुरलेले आहेत. कोंडीचा धबधबा हा तसा दुर्लक्षित असून मोजक्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळे या धबधब्याची माहिती नागरिकांना व्हावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने स्थानिक तरुणाचे प्रयत्न सुरू आहेत.

दगडावर वाघाचे चित्र आकारले

चित्रकार महेंद्र गावंडने दगडाला दिला वाघचा चेहरा

खानाव येथील महेंद्र गावंड हा चित्रकार आणि वाळू शिल्पकार असून त्याने कोंडीचा धबधबा येथील दगडावर कलाकृती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने आधीच वाघाच्या तोंडाच्या आकाराचा दगड तयार झालेला आहे. या दगडाला आपल्या सहकार्याच्या साहाय्याने महेंद्र याने रंगरंगोटी करून सुंदर असे वाघ डरकाळी फोडतानाची कलाकृती साकारली आहे. वाघाची बनवलेली ही कलाकृती धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार असून सेल्फी पॉईंट म्हणून ओळख ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगारही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतर काही कलाकृतीही दगडावर बनविणार असल्याचे महेंद्र गावंड यांनी संगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details