महाराष्ट्र

maharashtra

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर टेम्पोला लागली आग, आगीत एकाचा होरपळून मृत्यू

By

Published : Oct 13, 2021, 12:32 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस'वेवर टेम्पोला लागली आग

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर मागील काही दिवसात वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री रसायनी जवळ (किमी 18/900) याठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोला अचानक आग लागली. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे'वर मागील काही दिवसात वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. मंगळवारी मध्यरात्री रसायनी जवळ (किमी 18/900) याठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोला अचानक आग लागली. या आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सदरचा मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे'वर टेम्पोला लागली आग, आगीत एकाचा होरपळून मृत्यू

फायर ब्रिगेड खोपोलीची टीम घटनास्थळी दाखल झाली

मंगळवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान सदर 18.900 किलोमीटरला पुणे लेनवर शोल्डरला उभी होती. नाईट पेट्रोलिंग करणाऱ्या आयआरबीच्या टीमने तेथे उतरून पाहणी केली. त्यावेळीं गाडीत कोणी आढळले नाही. त्यांनी सेफ्टी कोन लावले, गाडीची नोंद घेतली आणि ते पूढे निघून गेले. मात्र, काही वेळानंतर त्याच गाडीला आग लागल्याचे समजले. लागलीच फायर ब्रिगेड खोपोलीची टीम घटनास्थळी दाखल झाली. देवदूत यंत्रणेसोबत सिडको, रिलायन्स आणि आयआरबीच्या फायर ब्रिगेडने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात विविध पप्रकारच्या वस्तू, सौदर्य प्रसाधने, अगरबत्ती, वायर, इलेक्ट्रिकल साहित्य भरले होते. बऱ्याच प्रयत्नांती आग नियंत्रणात आली. मात्र, टेम्पोच्या केबिनमधे एक मृतदेह पुर्ण जळलेल्या स्थितीत दिसून आला.

अद्यापही मृत व्यक्तीबद्दल माहिती मिळाली नाही

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे विजय भोसले, गुरूनाथ साठेलकर, अमित गुजरे, यासिन शेख यांनी यात मदत केली. मृतदेह बाहेर काढून चौक रुग्णालयात शविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. या भीषण घटनेत पळस्पे वाहतूक पोलीस, रसायनी बनपोलीस स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्सचे कर्मचारी यांनी मदतकार्यात भाग घेतला. गाडीच्या नंबर वरुन मिळालेल्या डीटेल्स नुसार गाडी मालक व मृत्यू व्यक्तीची ओळख बाबत फोन करण्यात आले. मात्र प्रतिउत्तर न मिळाल्याने अद्यापही मृत व्यक्तीबद्दल माहिती मिळाली नाही. तसेच आग लागल्यावर व आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत पुणे कडे जाणारी वाहतूक बाधीत झाली होती.

हेही वाचा -दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच! मात्र आपली 'राजकीय ईस्ट इंडिया कंपनी' झोपेत;'सामना'तून केंद्र सरकारवर प्रहार

ABOUT THE AUTHOR

...view details