महाराष्ट्र

maharashtra

सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला

By

Published : Feb 8, 2020, 6:48 PM IST

Updated : Feb 8, 2020, 9:49 PM IST

मी कधी मंत्र्यांच्या घरी जात नाही. मात्र, गेल्या सरकारच्या काळात शिक्षकांच्या काही मागण्यांसाठी मी २ ते ३ वेळा शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो होतो. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे सारखे सांगून जर  विद्यार्थ्याला समजत नसेल, तर धडा शिकवावा लागतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला.

Sharad pawar comment on Bjp in raigad
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुंबई -मी कधी मंत्र्यांच्या घरी जात नाही. मात्र, गेल्या सरकारच्या काळात शिक्षकांच्या काही मागण्यांसाठी मी २ ते ३ वेळा शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो होतो. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे सारखे सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल, तर धडा शिकवावा लागतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला. एका झटक्यात शिक्षकांच्या सगळ्या मागण्या सुटणार नाहीत. मात्र, आम्ही सगळे बसून, शिक्षकांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असेही पवार यावेळी म्हणाले.

मुंबई येथे आयोजित शिक्षक भारती संघटनेच्या अधिवेशनात शरद पवार बोलत होते. लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धड्यात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, असे शिकवले जाते. त्यांना वाटले ही लहान मुले बघतील कमळ, असेही पवार उपरोधात्मक म्हणाले. मात्र, माझ्यावर लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत. हे सांगताना पावरांनी त्यांची लहानपणीची आठवण सांगितली. मी ७ दिवसांचा असताना माझी आई मला घेऊन शाळा बोर्डाच्या बैठकीला गेली होती. ७ दिवसांचा असताना मी शिक्षकांची बैठक बघितली आहे. त्यामुळे मी कमळ कसे बघेन असेही पवार म्हणाले.

पवारांचा भाजपला टोला

हेही वाचा - IND vs NZ : एकदिवसीय मालिकेत भारताचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली

हेही वाचा - प्रियांका गांधींच्या मुलाने पहिल्यांदा केले मतदान, म्हणाला...

मला आणि संजय राऊतांना प्रशासनाचा अधिकार नाही

मला आणि संजय राऊतांना प्रशासनाचा अधिकार नाही. मात्र, आम्ही मंत्र्यांना या प्रश्नासंबधी सांगू, ते आमचे ऐकतील असे वाटते, असेही पवार यावेळी म्हणाले. मी आणि संजय राऊत मागितला तर सल्ला देतो, असेही पवार म्हणाले.

सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला



रायगड - मी कधी मंत्र्यांच्या घरी जात नाही. मात्र, गेल्या सरकारच्या काळात शिक्षकांच्या काही मागण्यांसाठी मी २ ते ३ वेळा शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो होतो. मात्र त्याचा काही उपयोग झाला. त्यामुळे सारखे सांगून जर  विद्यार्थ्याला समजत नसेल, तर धडा शिकवावा लागतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला. एका झटक्यात शिक्षकांच्या सगळ्या मागण्या सुटणार नाहीत. मात्र, आम्ही सगळे बसून, शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असेही पवार यावेळी म्हणाले.



रायगड येथे आयोजीत शिक्षक भारती संघटनेच्या अधिवेशनात शरद पवार बोलत होते. लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धड्यात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असे शिकवले जाते. त्यांना वाटलं ही लहान मुले बघतील कमळ असेही पवार म्हणाले. मात्र, माझ्यावर लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत. हे सांगताना पावरांनी त्यांची लहानपणीची आठवण सांगितली. मी ७ दिवसांचा असताना माझी आई मला घेऊन स्कुल बोर्डाच्या मिटींगला गेली होती. ७ दिवसांचा असताना मी शिक्षकांची मिटींग बघीतली आहे. त्यामुळे मी कमळ कसे बघेल असेही पवार म्हणाले.



मला आणि संजय राऊतांना प्रशासनाचा अदिकार नाही

मला आणि संजय राऊतांना प्रशासनाचा अधिकार नाही. मात्र, आम्ही मंत्र्यांना या प्रश्नासंबधी सागू, ते आमचे एकतील असे वाटतय असेही पवार यावेळी म्हणाले. मी आणि संजय राऊत मागितला तर सल्ला देतो असेही पवार म्हणाले.




Conclusion:
Last Updated : Feb 8, 2020, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details