महाराष्ट्र

maharashtra

पेण गणपतीचे माहेरघर; गणेश मूर्तीला विदेशात मागणी

By

Published : Aug 23, 2019, 1:26 PM IST

पेणमधील चौदा विद्या, कलांमधील विभूषीत गणराय 2 सप्टेंबरला गणेशभक्तांच्या घरी विराजमान होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्ताचीही लगबग सुरू झाली आहे. गणेश कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यावर रंगरंगोटी करण्याची लगबग कारागिर करीत आहेत.

पेण गणपतीचे माहेरघर; गणेश मूर्तीला विदेशात मागणी

रायगड - गणरायाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये गणेश मूर्ती तयार झाल्या आहेत. याठिकाणाहून देशातील अनेक राज्यात तसेच ऑस्ट्रेलिया, लंडन, थायलंड, बँकॉक, अमेरिका याठिकाणी पेणच्या गणरायाला प्रचंड मागणी आहे. हजारो गणपतीच्या मूर्ती विदेशात पाठविण्यात आलेल्या आहेत.

पेण गणपतीचे माहेरघर; गणेश मूर्तीला विदेशात मागणी

चौदा विद्या, कलांमध्ये विभूषीत असलेला गणराय 2 सप्टेंबरला गणेशभक्तांच्या घरी विराजमान होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्ताचीही लगबग सुरू झाली आहे. गणेश कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यावर रंगरंगोटी करण्याची लगबग कारागिर करीत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिससोबत शाडूच्या 15 ते 20 लाख गणपतीच्या मूर्ती पेण तालुक्यात बनविल्या जातात. यासाठी अडीच लाख कारागीर वर्षभरापासून कारखान्यात मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत.

पेणच्या गणपती मूर्तीचे आकर्षण म्हणजे आखीव डोळे, रंगरंगोटी, दागिने तसेच नेसवलेले धोतर व फेटा आहे. यामुळे गणरायाची मूर्ती भक्तिभावाने भविकांकडे पाहत असल्याचा भास होतो. यावर्षी शाडूच्या गणरायाला पुन्हा मागणी वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्याची संकल्पना जोर धरत आहे.

यंदा माऊली व फेटेवाला या गणरायाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. बनविलेला फेटा व धोतर गणरायाला घातले असल्याने मूर्तीची सुंदरता वाढलेली आहे. पेणमध्ये १ फुटापासून ते १५ फुटापर्यंत आकर्षक गणरायाच्या मुर्ती बनविल्या जातात. पेणमधील गणपती मूर्ती जिल्ह्यासह इतर राज्यात व परदेशात पाठविल्या जात आहेत. पेणमधील गणपती कारखान्यात कारागिरांची गणपती मूर्ती पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गेले २४ तास काम सुरू आहे. गणेश चतुर्थीपर्यंत गणरायाच्या मूर्ती तयार होऊन गणेश भक्ताच्या घरी विराजमान होणार आहेत.

Intro:गणरायाच्या मूर्तीला शेवटचा हात मारण्यासाठी कारखान्यात लगबग सुरू

पेण हे गणपतीचे माहेरघर

15 ते 20 लाख गणराय मूर्ती होतात तयार

राज्यासह परदेशातही पेणच्या गणराय मूर्तीला प्रचंड मागणी



अँकर : गणरायाचे आगमन दहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणरायाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण मध्ये आता गणरायाच्या मूर्तीवर शेवटचा हात मारण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेणचे गणपती हे जगभरात प्रसिद्ध असून गणपतीच हब म्हणून पेणला म्हटले जाते. ऑस्ट्रेलिया, लंडन, थायलंड, बँकॉक, अमेरिका तसेच इतर परदेशात व राज्यात पेणच्या गणरायाला प्रचंड मागणी आहे. हजारो गणपतीच्या मूर्ती ह्या परदेशात पाठविण्यात आलेल्या आहेत.

विवो

चौदा विद्या, कलांमध्ये विभूषित असलेला गणराय 2 सप्टेंबर रोजी गणेशभक्तांच्या घरी विराजमान होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्ताचीही लगबग सुरू झाली आहे. गणेश कारखान्यात गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून त्यावर रंगरंगोटी करण्याची लगबग कारागिरकडून जोरदार सुरू झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस सोबत शाडूच्या 15 ते 20 लाख गणपतीच्या मूर्ती पेण तालुक्यात बनविल्या जातात. यासाठी अडीच लाख कारागीर वर्षभरापासून कारखान्यात मूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत.

सचिन समेळ बाईट


Body:विवो 2

पेण च्या गणपतीच्या मूर्त्याचे आकर्षण म्हणजे आखीव डोळे, रंगरंगोटी, दागिने तसेच नेसवलेले धोतर व फेटा. यामुळे गणरायाची मूर्ती ही भविकाकडे भक्तिभावाने पाहत असल्याचा भास दिसत असतो. यावर्षी शाडूच्या गणरायाला पुन्हा मागणी वाढली आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा होण्याची संकल्पना जोर धरत आहे.



Conclusion:विवो 3

यावर्षी माऊली व फेटेवाला या गणरायाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. हाती बनविलेला फेटा व धोतर गणरायाला घातले असल्याने मूर्तीची सुंदरता वाढलेली आहे. पेणमध्ये एक फुटपासून ते पंधरा फुटापर्यंत आकर्षक गणरायाच्या मुर्त्या बनविल्या जातात. पेण मधील गणपती मूर्ती ह्या जिल्ह्यासह, इतर राज्यात व परदेशात पाठविल्या जात आहेत. पेण मधील गणपती कारखान्यात कारागिरांची गणपती मूर्ती पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू झाली असल्याने चोवीस तास काम सुरू आहे. गणेश चतुर्थी पर्यंत गणरायाच्या मूर्ती तयार होऊन गणेश भक्ताच्या घरी विराजमान होणार आहेत.

फायनल विवो

ABOUT THE AUTHOR

...view details