महाराष्ट्र

maharashtra

Traffic Jams : केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प

By

Published : Mar 26, 2022, 10:01 AM IST

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) खंडाळा घाटातील अमृतांजन पुला खाली एक केमिकलच्या टँकर उलटला (Chemical tanker overturned) आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. या प्रकारामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प (Mumbai-Pune Expressway blocked) झाला असून लोणावळा शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai-Pune Expressway blocked
मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प

रायगड: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली एक केमिकलच्या टँकर उलटला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. तर सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. केमिकल रस्त्यावर उतारामुळे लांबवर पसरल्याने मुंबई बाजुकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. सर्व वाहने लोणावळा शहरातून जुन्या हायवेवर वळविण्यात आली आहेत. यामुळे लोणावळा शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाली असून खंडाळा, लोणावळा ते एक्सप्रेस वेच्या वलवण येथील एक्झिट पॉईटपर्यत वाहनांच्या रांगा रांगा पहायला मिळत आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details