महाराष्ट्र

maharashtra

खावटी अनुदान ही आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना -आदिती तटकरे

By

Published : Jul 17, 2021, 8:58 PM IST

खावटी ही आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना आहे. त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवाना देण्याच्या दृष्टीने लाभार्थी वर्गाची माहिती घेऊन वाटप केली जाणार आहे. अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खावटी वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना खावटी वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला
रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना खावटी वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला

रायगड - खावटी ही आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना आहे. त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवाना देण्याच्या दृष्टीने लाभार्थी वर्गाची माहिती घेऊन वाटप केली जाणार आहे. अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना खावटी वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खावटी वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे

'रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी समाज'

खावटी ही आदिवासी बांधवांच्या हक्काची योजना आहे. त्याचा लाभ रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवाना देण्याच्या दृष्टीने लाभार्थी वर्गाची माहिती घेऊन वाटप केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात जवळपास 48 हजार लाभार्थी कुटुंब आहेत. खालापुमध्ये सर्वाधिक 10 हजार आदिवासी कुटुंब आहेत. या पार्श्वभूमीवर योजनेचा येथे शुभारंभ करण्यात आला आहे. कोणतेही कुटुंब या योजनेपासून दूर राहता कामा नये, यासाठी अधिकारी वर्गाने गांभीर्याने ही योजना सर्वांपर्यंत पोहचवावी अशा सूचना आदीती तटकरे यांनी दिल्या आहेत.

'योजना सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांचे'

रायगड जिल्ह्यात 48 हजाराहून अधिक आदिवासी कुटुंब आहेत. तर, खालपुरात सर्वाधिक 10 हजाराहून अधिक कुटूंब आदिवासी बांधव आहेत. दरम्यान, ही खावटी योजना त्या सर्वांपर्यंत पोहचवण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांचे आहे. त्यांनी ते गांभीर्याने करावे अशा सूचना, तटकरे यांनी केल्या आहेत. तसेच, वाड्या वस्त्यांवर शिबिरे घेऊन शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती द्यावी. त्यामुळे आदिवासी बांधवाना शासनाच्या योजनांची माहिती होईल. तसेच, त्याचा लाभही त्यांना घेता येईल.

'लसीकरणाच्या बाबतीत चुकीचे गैरसमज पसरले'

लसीकरणाच्या बाबतीत चुकिचे गैरसमज पसरले आहेत. मात्र, हा गैरसमज दूर करून सर्वांनी लस घ्यावी. तिसऱ्या लाटेचा सामना करायचा असेल, तर लसीकरण प्रत्येकाने करून घेणे गरजेचे आहे. असे आवाहन या निमित्ताने आदिवासी बांधवांसह सर्वांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. यावेळी अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, प्रांत अधिकारी वैधाली परदेशी, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, उमाताई मुंढे, तहसीलदार इरेश चप्पलवार, खालापूर पोलीस विभागीय अधिकारी संजय शुक्ला, खालापूरच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम, पंचायत समितीच्या सभापती वृषाली पाटील, उपसभापती विश्वनाथ पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये नायब तहसीलदार कल्याणी कदम, राजेश्री जोगी, युवक जिल्ह्याध्यक्ष राष्ट्रवादी अंकित साखरे, तालुकाध्यक्ष एच.आर.पाटील, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे यासह अन्य शासकीय अधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details