महाराष्ट्र

maharashtra

रायगडमध्ये 'लंपी' रोगामुळे शेकडो गुरेढोरे क्वारंटाईन

By

Published : Aug 6, 2021, 9:09 AM IST

Hundreds quarantine cattle in Khalapur due to 'Lampi' disease

खालापूर तालुक्यात गाय, बैलांना लंपी या आजाराने ग्रासले आहे. या आजारात जनावरांच्या त्वचेवर गाठी येऊन त्याचे फोड तयार होतात. ते फुटतात त्यातून चिकट द्रव वाहतो. या रोगामुळे जनावरे खाणेपिणे सोडत आहेत. वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांच्यावर मृत्यूही ओढावत आहे. एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला लंपीची लागण होत असल्याने हा रोग झपाट्याने पसरत आहे.

खालापूर (रायगड) -कोरोना महामारीमुळे माणसांना विलगीकरण करावे लागत असतानाच खालापूर तालुक्यात शेकडो गुराढोरांचे विलगीकरण करावे लागले आहे. निमित्त आहे गाई, बैलांना लागण झालेल्या 'लंपी' रोगाचे. संसर्गजन्य असल्याने हा रोग झालेल्या गुरांना सक्तीने वेगळे ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे गावकऱ्यांमध्येही घबराट पसरली आहे.

रायगडमध्ये 'लंपी' रोगामुळे शेकडो गुरेढोरे क्वारंटाईन

गुरांसाठी लसीकरण सुरू -

खालापूर तालुक्यात गाय, बैलांना लंपी या आजाराने ग्रासले आहे. या आजारात जनावरांच्या त्वचेवर गाठी येऊन त्याचे फोड होतात. ते फुटतात त्यातून चिकट द्रव वाहतो. या रोगामुळे जनावरे खाणेपिणे सोडत आहेत. वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांच्यावर मृत्यूही ओढावत आहे. एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला लंपीची लागण होत असल्याने हा रोग झपाट्याने पसरत आहे. या रोगाची लागण झालेल्या गुरांना वेगळे ठेवून त्यांना तात्काळ लस देण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

शेतकरी चिंतेत -

कोरोनाचा वार आणि निसर्गाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांपुढेहे नवीन संकट उभे राहिले आहे. गुरांमध्ये लंपी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याने या परिसरातील शेतकरी चिंतेत आहे.

लंपी रोगाची लागण होताच गुरे खाणे-पिणे सोडतात -

खालापूर तालुक्यातील काही गावांमध्ये पाळीव गुरांमध्ये विशेषता गाय-बैल यामध्ये लंपी रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. जनावरांच्या त्वचेवर गाठ येत असून फोड झाल्याने जनावरे खाणे-पिणे सोडत आहेत. गाय आणि बैल यांमध्ये मोठ्या प्रमाणात लंपी रोगाची लागण झाली आहे. दुभत्या जनावरास लंपी रोगाची लागण झाल्यास त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. लंपी रोगाची लागण झालेल्या गुरांचे मृत्यूचे प्रमाण एक टक्का असले तरी एका जनावरापासून दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता असल्याने लंपी रोग झपाट्याने पसरत आहे. या रोगाची जनावरे चौक आसपासच्या भागात सापडली आहेत, अशी माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details