महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर 9 महिन्यात 146 अपघात; 100 फूट दरीत कोसळून एक ठार

By

Published : Nov 30, 2022, 12:54 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर 9 महिन्यात तब्बल 146 अपघात झाल्याची माहिती समोर येत ( 146 Accidents In 9 Month ) असून, या अपघातामधून 48 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Mumbai Pune Expressway
मुंबई पुणे एक्सप्रेस

रायगड :मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग अपघातांचा मार्ग म्हणून प्रसिद्धीस येत ( Mumbai Pune Express accidental Route ) आहे. या मार्गवर 9 महिन्यात तब्बल 146 अपघात झाल्याची माहिती समोर येत ( 146 Accidents In 9 Month ) असून, या अपघातामधून 48 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक नियमाच्या उल्लंघनांमुळे हे अपघात होत आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम दंड आकरणी करण्यात आली आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर आज पुन्हा एकदा महामार्गावरील बोर घाटात भीषण अपघात झाला आहे. तीन ट्रक समोरासमोर एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जोरात होती की, यातील दोन ट्रक जवळ असलेल्या १०० फूट दरीत पलटी झाल्या आहे. या घटनेत एक जण जागीच ठार झाला



याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई - पुणे महामार्गावर असणाऱ्या मूबई लेनवर खोपोली हद्दित असणाऱ्या बोरघाट परिसरात तीन ट्रकची एकमेकांना जोरात धडक झाली. यामध्ये दोन कंटेनरचा चक्काचुर झाला झाला आहे. हिंधडक झाल्यानंतर दोन कंटेनर चक्क जवळ असलेल्या १०० फूट दरीत कोसळली. त्यामुळे या अपघाताची भीषणता आणखी वाढली. दरीत कोसळल्याने एका चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा वाचवण्याचे काम स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.

एका कंटेनरमध्ये कांदे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये घरगुती सामना असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एक कंटेनर रस्त्यावर पलटी झाल्याने संपर्ण रस्त्यावर कांदेच कांदे झाले होते. या घटनेने बोर घाटात वाहतूक कोंडी झाली असून ती सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटना स्थळी बचाव कार्य सुरू आहे

100 फूट खोल दरीत ट्रक कोसळला : बुधवारी पहाटेच्या वेळेस मुंबई, पुणे एक्सप्रेस मार्गवर मुंबईकडे येणारा एक ट्रॅक 100 फूट दरीत कोसळून अपघात ( Truck Fell Into Deep Valley ) झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच देवदूत टीम, खोपोली पोलीस आणि अपघातग्रसतांच्या मदतीसाठी संघटनेचे सदस्य घटनास्थळी पोहचून बचावकार्य पूर्ण केले आहे. यामध्ये यामध्ये अजित जाधव नामक इसमाचा मृत्यू झाला असून, मंगलू नामक इसमाला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. एकंदरीत मुंबई, पुणे एक्सप्रेस मार्गवरील अपघातांचा आढावा घेतला असता नऊ महिन्यात 146 अपघात या मार्गवर झाले असून, 48 जण अपघाती मृत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्याप्रमाणात होत असून, बेदारकार वाहने चालवणाऱ्या चालकाच्या चुकांमुळे हे अपघात होत असल्याची माहिती पुढे येत आहे.

वाहतूक पोलिसांकडून 1 कोटींपेक्षा जास्तची दंड वसूली : वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहन चालकाच्या चुकामुळे रस्ते अपघाताची संख्या सतत्याने वाढत आहे. मुंबई, पुणे एक्सप्रेस मार्ग देखील याच गोष्टींमुळे अपघातांचा मार्ग म्हणून ओळखला जात आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी निरनिराळे उपाय करण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र तरीही नियमांचे उल्लंघन करणे आणि यामुळे अपघात होणे सुरूच आहे. मागील 9 महिन्यात या मार्गवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करत एक्सप्रेस मार्ग वाहतूक पोलिसांनी 7 हजार 350 वाहनांवर कारवाई करत तब्बल 1 कोटींपेक्ष जास्त दांडा वसूली केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details