महाराष्ट्र

maharashtra

Youth Death In Short Circuit: घरगुती गणेशोत्सवाच्या विद्युत रोषणाईमुळे शॉर्ट सर्किट; तरुणाचा झोपेतच मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:39 PM IST

Updated : Sep 24, 2023, 7:10 PM IST

Youth Death In Short Circuit: घरातील गणपतीच्या सजावटीसाठी (Ganeshotsav 2023) लावलेल्या विद्युत रोषणाईच्या माळांमुळे शॉर्टसर्कीट होऊन एका युवकाचा झोपेतच होरपळून मृत्यू (Burn to death due to short circuit) झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक (Kharpudi Budruk) येथे काल (शनिवारी) रात्री घडली.

Youth Death In Short Circuit
तरुणाचा झोपेतच मृत्यू

पुणे (खेड) Youth Death In Short Circuit: देशभरात गणेशोत्सवाची धुमधाम सुरू असताना दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात गणपती सजावटीसाठी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या घटनेत घरात झोपलेल्या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुका हादरला आहे. भव जगन्नाथ गरुड ( वय ३५ रा.दत्तनगर,खेड) असं होरपळून मृत्यू (Death in Ganeshotsav) झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव हा परिसरात सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होता.


गरुड कुटुंबात गणेशोत्सवाची धूम:वैभव जगन्नाथ गरुड ( वय ३५ रा.दत्तनगर,खेड) असं होरपळून मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खरापुडी बुद्रुक येथील दत्तनगर येथे वैभव गरुड हे त्यांच्या कुटुंबासमवेत राहतात. गरुड यांनी त्यांच्या घरात नुकतंच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव निमित्त बाप्पाचं धूम धडाक्यात स्वागत करत मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. घरातील गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाई करण्यासाठी लाईटच्या माळा लावल्या होत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री सगळे झोपेत असताना अचानक घरात शॉर्ट सर्किट झालं आणि घरात आग लागली. त्यामुळे घरातील सर्व साहित्य त्यात साड्या, बेड आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.

  • परिसरात शोककळा:या आगीत गादीवर झोपलेले वैभव यांचा देखील जागेवरच होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर तात्काळ माहिती स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर वैभव गरुड याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

  • ग्रामस्थांमधून हळहळ:वैभव गरुड हा परिसरात सर्पमित्र म्हणून परिचित होता. त्याच्या पाठीमागे पत्नी व दोन लहान मुली आहेत. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने पत्नी देखील धक्क्यात आहे. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अनेकांना ऐकून हादरा बसला आहे. वैभव याच्या जाण्यानं त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

  1. शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीमुळे झाला गॅस सिलिंडरचा स्फोट, घरगुती साहित्य जळून खाक
  2. शॉर्टसर्किटमुळे ट्रक जळून खाक; जीवितहानी नाही
Last Updated :Sep 24, 2023, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details