महाराष्ट्र

maharashtra

Ulhas Bapat On Devendra Fadnavis : 'आता मलाच फडणवीसांची शिकवणी घ्यावी लागणार', उल्हास बापट असं का म्हणाले?

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 2:12 PM IST

Ulhas Bapat On Devendra Fadnavis : अपात्रतेबाबत कुठलीही कार्यवाही होईल, असं वाटत नाही. मात्र, तशी कुठलीही कारवाई झाली, तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis and Ulhas Bapat
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घटनातज्ञ उल्हास बापट

पुणे Ulhas Bapat On Devendra Fadnavis : शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांचा निर्णय कधीही येण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार अपात्र होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला साफ नकार दिलाय. तसेच असं झालं तरी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं ते म्हणालेत. दरम्यान, फडणवीसांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुनच आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी टीका केली. तसंच आता मलाच फडणवीसांची शिकवणी घ्यावी लागणार, असंही ते म्हणालेत.

नेमकं काय म्हणाले उल्हास बापट : या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना उल्हास बापट म्हणाले की, फडणवीस राज्यघटनेबाबत अज्ञान आहेत. त्यांना कोणत्याही मार्गानं सत्तेत राहायचंय. त्यामुळं ते असं वक्तव्य करत आहेत. विधान परिषदेवर निवडून आलं तरच मुख्यमंत्री होता येतं. नॉमिनेटेड व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकत नाही. राज्यपाल नियुक्त व्यक्ती कसा मुख्यमंत्री होतो? आता मलाच फडणवीसांची शिकवणी घ्यावी लागणार असं वाटतंय. तसंच त्यांनी कायदे तज्ज्ञांशी बोलूनच विधान करावं, असं बापट म्हणाले.

लोकांचा राज्यपाल, निवडणूक आयोग, न्यायालयावरचा विश्वास कमी होतोय :मुख्यमंत्री अपात्र झाले तर त्यांना विधानपरिषदेवर घेता येतं का असं विचारण्यात आलं. त्यावर बापट म्हणाले की, हे राज्यपालांच्या हातात असतं. महाविकास आघाडीचे सरकार असताना बारा आमदारांची यादी तत्कालीन राज्यपालांना देण्यात आली होती. मात्र त्यावर त्यांनी काहीच केलं नाही. कायद्यानं बघितलं तर मंत्रिमंडळानं जो सल्ला दिला, त्याची अंमलबजावणी राज्यपालांना करावी लागते. पण आता तसं होताना दिसत नाहीय. त्यामुळं लोकांचा राज्यपाल, निवडणूक आयोग,आणि काही अर्थानं न्यायालयावरचा विश्वास कमी होत चाललाय. ही खरंच चिंतेची बाब आहे.

राज्यपालांसह विधानसभा अध्यक्षांवर साधला निशाणा :दरम्यान, यावेळी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्यपालांसह विधानसभा अध्यक्षांवर टीका केली. ते म्हणाले की, राजकीय भ्रष्टाचार थांबवण्यासाठी अपात्र आमदारांवर कारवाई होत असते. मात्र, त्याकरिता निकाल लवकर लागला पाहिजे. निकालाला विलंब होणं हे बरोबर नाही. यात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षही दोषी आहेत.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी...; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला 'प्लॅन बी'
  2. MLA Disqualification Hearing : राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  3. Uddhav Thackeray: ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट होणार? विभागप्रमुख पदासाठी 'यांना' संधी मिळण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details