महाराष्ट्र

maharashtra

Artificial Organ Transplant : कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्रात 60 हजारा पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

By

Published : May 14, 2022, 8:05 PM IST

artificial organ transplant center

‘नको व्हीलचेयर नको कुबड्या’, हे बोधवाक्य असलेल्या पुण्यातील कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्र (artificial organ transplant center), 1944 मध्ये स्थापन झाल्यापासून सात दशक अभिमानास्पद वाटचाल करत आहे. हे केंद्र भारतीय सैन्याच्या (Indian Army) जखमी शूर सैनिकांना कृत्रिम हात - पाय, उपकरणे आणि पुनर्वसन सुश्रुषा देत आहे. आत्ता पर्यंत येथे 60 हजारा पेक्षा जास्त रुग्णांवर (Treatment of more than 60,000 patients) उपचार झाले आहेत.

पुणे:कृत्रिम अवयव प्रत्यारोपण केंद्रात (artificial organ transplant center) दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक असे पुनर्वासनाधारित सर्वंकष उपचार देण्यात येतात. स्थापना झाल्यापासून इथे 60,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उचार करण्यात आले (Treatment of more than 60,000 patients) आहेत. या केंद्रात शारीरिक अडचण आलेल्या रुग्णांना सर्वोत्तम कृत्रिम अवयव आणि ऑर्थोटिक उपचार करण्यात येतात, जेणेकरून प्रत्येक दिव्यांगाचे स्वतःच्या पायावर चालण्याचे स्वप्न खरे करण्याचे ध्येय गाठता येते.

केंद्राच्या रुग्णांमध्ये सशस्त्र सैन्य दलांचे कर्मचारी, सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयांचा समावेश आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आसाम रायफल्स, इंडो तिबेटीयन सीमा पोलीस यासारख्या निमलष्करी दलातील आणि नागरी रुग्णांना देखील आवश्यक ते कृत्रिम आणि ऑर्थोटिक उपचार पुरविण्यात येतात, मात्र त्यासाठी शुल्क आकारले जाते. नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश वगैरे शेजारी देशांतील रुग्णांची देखील या केंद्रात पुनर्वसन आणि शुश्रुषा केली जाते.


पुनर्वसन केंद्राच्या संकल्पनेत, अनेक व्यापक उपक्रम समाविष्ट आहेत. ज्यात, चकमकीत जखमी झालेल्या व्यक्तींवर होणारे, भावनिक, मानसिक तसेच सामाजिक स्तरावरचे तात्कालिक आणि दूरगामी असे दोन्ही परिणाम विचारात घेऊन, त्यावर उपाययोजना करणारे उपक्रमही आखण्यात आले आहेत. या केंद्रात 'करुणामय मनाने काळजी घ्या’ या तत्वाला महत्त्व दिले जाते. खासकरुन, पुनर्वसन केंद्रात या सर्व गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.


केंद्र लष्कराच्या खडकीयेथील पॅरालिंपिक क्रीडा विभागाशी जोडलेले आहे. या केंद्रात अनेक दिव्यांग पॅरालिंपिक खेळाडूंवर अवयव प्रत्यारोपणाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. एएलसी पुणे मुळे अनेक ‘ब्लेड रनर्स’ खेळाडू भारतीय लष्कराचे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करु शकले आहेत, एवढेच नाही, तर त्यांनी भारतासाठी अनेक पदकेही जिंकली आहेत.

केंद्रात तरण तलाव पणआहे जो येथील प्रत्येकाच्या सोईचा विचार करुन तयार केला गेला आहे. त्याशिवाय 'मल्टी स्टेशन ’, खेळाचे मैदान, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलची मैदाने अशा सुविधा आहेत. या सर्व ठिकाणी दिव्यांग जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी विविध क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन आणि सुविधा दिल्या जातात.

हेही वाचा : सर्वांना विश्वासात घेऊनच बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय होणार - माजी महापौर मुरलीधर मोहोळ

ABOUT THE AUTHOR

...view details