महाराष्ट्र

maharashtra

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

By

Published : Oct 22, 2022, 10:50 PM IST

Updated : Oct 22, 2022, 10:56 PM IST

पुणे रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आज शनिवार (दि. 22)रोजी संध्याकाळी सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली आहे. त्यामुळे रेल्वे ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी एकाचा मृत्यू
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी एकाचा मृत्यू

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या सर्वत्र दिवाळी सण उत्साहात सुरू असताना दिवाळी निमित्त नागरिक आपापल्या गवाल जात असल्याने बस स्थानक तसेच रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आज शनिवार (दि. 22)रोजी संध्याकाळी सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे रेल्वे ट्रेनमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

आज संध्याकाळ च्या सुमारास पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाला जीव गमवावा लागला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी उसळली आणि गर्दीतून रेल्वे ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रवाशाचा चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Last Updated : Oct 22, 2022, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details