महाराष्ट्र

maharashtra

मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एसटी कामगार संघटना आक्रमक

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 4:25 PM IST

ST Workers Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. (ST workers aggressive) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्या विरोधात आता एसटी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 13 फेब्रुवारी पासून राज्यातील विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ST Workers Strike
एसटी कामगार संघटना

एसटी कामगारांच्या संपाच्या इशाऱ्याविषयी माहिती देताना कामगार संघटनेचे पदाधिकारी

पुणेST Workers Strike :गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राज्य सरकार सोबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची बैठक झाली होती. त्या कामगार करारात सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढीचा दर कामगारांना देण्याचं सरकारने मान्य केलं होतं. (agitation of freighters) त्यानुसार मागील महागाई भत्त्यासोबतच घरभाडे भत्ता थकबाकी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन देण्याची मागणी केली होती. तरीही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता एसटी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. (ST workers union)

ना थकबाकी ना महागाई भत्ता :याबाबत संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले की, 19 सप्टेंबर रोजी संघटनेच्या बेमुदत उपोषण नोटीसच्या अनुषंगाने शासन पातळीवर संघटनेसमवेत झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळ आणि शासन यांनी मान्य केलेल्या कामगार करारात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा दर कामगारांना देण्याचे मान्य केलेले होते. त्यानुसार मागील महागाई भत्त्याची, घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते. परंतु अद्यापही बैठक झालेली नाही.

13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण :प्रशासनाने जाहीर केलेल्या रु. ४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कमेचे वाटप रु. १,०००/-, रु. ४,०००/- आणि रु. २,५००/- मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवाजन कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या विसंगती दूर करणे, राज्य परिवहन कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करणे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून आपला अहवाल शासनास ६० दिवसात सादर करण्याचे मान्य केलेलं आहे. ५० दिवसांची मुदत संपूनही त्यावर बैठक न झाल्यामुळे कामगारांत तीव्र असंतोष पसरलेला आहे. या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेच्या वतीने येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, असं यावेळी ताटे म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप :यावेळी अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांनी कामगारांच्या या बँकेचं वाटोळं केलं आहे. 70 वर्ष बँक ताब्यात असताना एकही रुपयांचा भ्रष्टाचार झाला नाही. सदावर्ते यांनी एसटी बँकेचं वाटोळं केल्यामुळेच 12 संचालकांनीच बंड पुकारलं आहे. सदावर्ते यांच्या काळात बँकेतून तब्बल पाचशे कोटींच्या ठेवी काढून घेतल्या गेल्या आणि त्यामुळेच बँकेची लिक्विडिटी घसरल्याने आज बँकेवर कर्जवाटप बंद करण्याची वेळ येऊन ठेपलीय.

हेही वाचा:

  1. भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड
  2. गौतमी पाटील कार्यक्रमात सत्तार यांची शिवराळ भाषा, व्हिडिओ झाला व्हायरल
  3. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे भेटीवर नाराजी भोवली; उबाठा जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details