महाराष्ट्र

maharashtra

SSC Board Exam 2023: उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा ; यंदा 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांची नोंदणी

By

Published : Mar 1, 2023, 1:19 PM IST

उद्यापासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. यंदाच्या परीक्षेत 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ५०३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

SSC Board Exam 2023
शरद गोसावी

प्रतिक्रिया देताना शरद गोसावी अध्यक्ष

पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक ०२ मार्च २०२३ ते शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी एकूण १५,७७,२५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८.४४.१९६ विद्यार्थी ७,३३,०६७ विद्यार्थीनी आहेत. एकूण २३,०१० माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.

बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड :मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली आहे. सरल डेटावरुन माध्यमिक शाळांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी दिनांक ०१ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.


हेल्पलाईन सुविधा उपलब्ध : मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेचे वेळापत्रक दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. तसेच जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय व मंडळामध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच स्तरावर राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत.





विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी :राज्यमंडळामार्फत सर्व विभागीय मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि. २७ मार्च २०२३ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत आऊट ऑफ टर्नने आयोजित करण्यात आलेली आहे.

भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन :मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत. २५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेवून व त्यानंतर स्वतःची स्वाक्षरी करून उघडतील. मार्च २०२३ च्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत. दहावी परीक्षांच्या कालावधीत गैरमार्गास आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांच्या भेटीचे नियोजन विभागीय मंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे.


हेही वाचा : Hanuman Mandir Beed: मराठवाड्यातील सर्वात उंच हनुमान.. नायगाव अभयारण्यातील 41 फूट हनुमानाची सर्वदूर ख्याती

ABOUT THE AUTHOR

...view details