महाराष्ट्र

maharashtra

Pune Crime News: परराज्यातील महिलांचे सुरू होते पुण्यात सेक्स रॅकेट, 'असा' झाला पर्दाफाश

By

Published : May 3, 2023, 10:21 AM IST

दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरून पिडीत महिलांना पुण्यात बोलावले जात होते. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाईन संपर्क करून पंचतारांकीत हॉटेलमध्ये पाठवुन सेक्स रॅकेट चालवले जात होते. सामाजिक सुरक्षा विभागाने या टोळीवर कारवाई केली आहे.

Pune Crime News
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कारवाई

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पुणे : परराज्यातील मुली महिलांना पैशाचे अमिष दाखवून त्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन त्यांना वेश्या व्यवसाकरीता पंचतारांकीत हॉटेल येथे पाठवुन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याबाबत दोन पिडीत मुली व तीन एजंट (आरोपी) मिळुन आले आहेत. त्यांना ताब्यात घेवुन तीन आरोपी यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा ठिकाणांवरून आलेल्या 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.


सापळा रचुन बनावट ग्राहक : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार परराज्यातील मुली, महिला यांना काही इसमांनी वॉट्सॲपद्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेतले. त्यांना वेश्या व्यवसाकरीता पुरवित असलेबाबत सामजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. त्यानंतर अशा एजेंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढून सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने सापळा रचुन बनावट ग्राहक बनवून वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली, असता एजंटने पुणे स्टेशन परीसरातील पंचतारांकित हॉटेल येथे दोन रुम बुक करण्यास सांगितले.


पीडित मुलींची सुटका :त्यांनतर या ठिकाणी दोन मुली हॉटेलमधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्या. नंतर अचानक छापा टाकला असता, या ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवून विचारपुस केली. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजेंटसह देवडा परीसरात असल्याची माहिती मिळाली. लगेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून महाराष्ट्र हौसींग सोसायटी येरवडा, पुणे येथुन दोन पिडीत मुली व तीन एजंट (आरोपी) मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन तीन आरोपी यांच्याविरूध्द बडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चार पीडित मुलींची सुटका यातून करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी करीत आहेत.

हेही वाचा: Husband Murder Case : पत्नीचे अनैतिक संबध अन् पती द्यायचा त्रास, प्रियकराच्या मदतीने केला पतीचा घात

ABOUT THE AUTHOR

...view details