महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा दिली, शरद पवारांनी मानले आभार

By

Published : Oct 27, 2019, 5:20 PM IST

दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार परिवार बारामती येथील गोविंद बागेत एकत्रित सण साजरा करतात. यावेळी पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक येतात. यावेळी पवारांनी विरोधकांना चांगले मताधिक्य दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले.

शरद पवार

पुणे - विधानसभा निवडणुकीत कोणी काहीही म्हणत असले तरी, महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा देऊन सन्मानजन्य प्रतिनिधींना निवडल्याबद्दल शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे जाहीर आभार मानले. बारामती येथे ते बोलत होते.

महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा दिली, शरद पवारांनी मानले आभार

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

पवार म्हणाले, जनतेने आमच्यावर जी अपेक्षा ठेवली आहे. त्याची पूर्तता करणे, आमचे कर्तव्य असून, ती आम्ही पूर्ण करू. सध्या ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्यानंतर घेतलेली पिके चांगली येऊन महाराष्ट्राची स्थिती बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेला हा दिवाळीचा सण सुखाचा समाधानाचा आणि समृद्धीचा जावो अशा शुभेच्छाही त्यांनी दिवळीनिमित्त दिल्या. दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार परिवार बारामती येथील गोविंद बागेत एकत्रित सण साजरा करतात. यावेळी पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक येतात.

हेही वाचा - विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

Intro:Body:बारामती..
पवारांनी कृतज्ञता केली व्यक्त...


विधानसभा निवडणुकीत कोणी काहीही म्हणत असले तरी, महाराष्ट्राच्या जनतेने विरोधकांना सन्मानाची जागा देऊन सन्मान जन्य प्रतिनिधींना निर्वाचित केल्याबद्दल शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे जाहीर आभार मानले... जनतेने आमच्यावर जी अपेक्षा ठेवली आहे. त्याची पूर्तता करणे, आमचे कर्तव्य असून, ती आम्ही पूर्ण करू... सध्या ठिकठिकाणी पाऊस पडतोय नंतर घेतलेली पिके चांगली येऊन महाराष्ट्राची स्थिती बदलेल असा विश्वास व्यक्त करून.. महाराष्ट्राच्या जनतेला हा दिवाळीचा सण सुखाचा समाधानाचा आणि समृद्धीचा जावो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.. दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्त शरद पवार यांच्यासह संपूर्ण पवार परिवार बारामती येथील गोविंद बागेत एकत्रित सण साजरा करतात.. यावेळी पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक येतात....Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details