महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar : प्रकाश आंबेडकर भेटीबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण; 'इंडिया'मध्ये सहभागी...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 3:31 PM IST

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (22 ऑक्टोबर) बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. तसंच विविध मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Sharad Pawar Baramati
'बावनकुळेंना भाजपनं तिकीट नाकारलं, त्यांच्यावर...', शरद पवारांची खोचक टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया

बारामती (पुणे) : Sharad Pawar : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व काँग्रेसवर टीका केली होती. दरम्यान, या टीकेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलक्या भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनमानसात आणि पक्षात काय स्थान आहे हे मला माहिती नाही. बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असून, मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याच पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं. याचा अर्थ तिकीट द्यायलासुद्धा ते लायक नाहीत, असं स्वतःचा पक्ष या व्यक्तीबद्दल बोलतो. तर त्यावर आपण काय भाष्य करायचं? असं म्हणत शरद पवार यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

कंत्राटी भरतीवर दिली प्रतिक्रिया : कंत्राटी भरतीबाबत बोलताना पवार म्हणाले की, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही. महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री आहेत. एकाचं मत तुम्ही सांगितलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी आज त्याच्यावर टिप्पणी केली आहे. त्यात हे स्पष्ट दिसतंय की ज्या वेळेला त्यासंबंधीचा निर्णय घेतला गेलाय, त्या निर्णयाच्या बैठकीला अनेक सहकारी हजर होते. ते आजही सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांची संमती होती. कंत्राटी कामगारांच्या संबंधीची अस्वस्थता कशाची होती? नोकरीमध्ये शाश्वती नाही, ठराविक काळासाठीच नोकरी आहे, दहा-अकरा महिन्यांची नोकरी म्हटल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य नाही, म्हणून अशा पद्धतीनं जागा भरणं योग्य नाही. हा आमचा आग्रह होता.

प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीबाबत दिली प्रतिक्रिया : पुढं 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारण्यात आलं असता पवार म्हणाले, 'इंडिया' आघाडीमध्ये जे-जे लोक सहभागी होतील, त्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र, कालची बैठक ही त्यासाठी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपीज' या पुस्तकाला शंभर वर्ष पूर्ण झाली, या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरला कार्यक्रम होता. या संदर्भासाठी आम्ही एकत्रित होतो, असं पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar : जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी केसेस अंगावर घ्या, शरद पवारांचा सल्ला, म्हणाले रास्त प्रश्नासाठी रस्त्यावर येणं आपला हक्क
  2. Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत
  3. Sharad Pawar On BJP : देशात दिवसेंदिवस भाजपा....; शरद पवारांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details