महाराष्ट्र

maharashtra

'शरद पवारांचा कृषी कायद्यांना जाणीवपूर्वक विरोध'

By

Published : Feb 1, 2021, 10:27 AM IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पवार जाणीवपूर्वक कृषी कायद्यांना विरोध करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

पुणे - आज संसदेमध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. हा अर्थसंकल्प सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल, असे वक्तव्य भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच शरद पवार जाणीवपूर्वक कृषी कायद्यांच्या विरोधात भूमीका घेत आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील

यावर्षीच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना भरीव मदत, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल. टॅक्स लॅब, गृहकरांबाबतही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एकूणच मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करणार हे बजेट असेल, असे पाटील म्हणाले.

शरद पवारांचा कृषी कायद्यांना जाणीवपूर्वक विरोध -

ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभामध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे. शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला. भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत -

केंद्र सरकारच्या शेतकरी, एनआरसी, युपीएए कायद्यांचे पोस्टर फाडून यल्गार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, मूठभर लोक कितीही असले तरी त्याचा हिंदू समाजाच्या मनावर कुठलाही परिणाम होणार नाही. हिंदू ही एक कार्यपद्धती आणि जीवन जगण्याची पद्धती आहे. त्या नियमांना सगळे जग स्वीकारत आहे, असे म्हणत पाटील यांनी यल्गार परिषदेवर टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details