महाराष्ट्र

maharashtra

तडीपार गुन्हेगारास ठोकल्या बेड्या, 2 पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त

By

Published : Jun 21, 2021, 7:35 PM IST

सराईत तडीपार गुन्हेगार मोहम्मद कोरबू हा सांगवी पोलीस ठाण्याच्या पिंपळे निलख परिसरात आल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त
2 पिस्तुलासह 5 जिवंत काडतुसे जप्त

पुणे (पिंपरी-चिंचवड) - सराईत गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसासह बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद कोरबू अस अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि मारामारी असे एकूण पाच गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली

सराईत तडीपार गुन्हेगार मोहम्मद कोरबू हा सांगवी पोलीस ठाण्याच्या पिंपळे निलख परिसरात आल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी संदीप पाटील शैलेश मगर यांना मिळाली. संबंधित सराईत आणि तडीपार गुन्हेगार हा अज्ञात व्यक्तीची वाट पहत थांबला आहे, असे समजले. त्यानुसार, मोहम्मदला सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच ठिकाणी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली आहेत. दरम्यान, त्याविऱोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनापरवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे पाच गुन्हे दाखल

मोहम्मद कोरबू हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला दिनांक (31 ऑक्टोबर 2020)ला दोन वर्षाकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील, सुधीर डोळस, शैलेश मगर, अशोक दुधवणे, सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, अशोक गारगोटे व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details