महाराष्ट्र

maharashtra

सांगवी पोलिसांनी सराईत मोबाईल चोराच्या आवळल्या मुसक्या; २४ मोबाईल हस्तगत

By

Published : Aug 13, 2019, 7:32 PM IST

पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत मोबाईल चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचे २४ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

सांगवी पोलिसांनी सराईत मोबाईल चोराच्या आवळल्या मुसक्या

पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत मोबाईल चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचे २४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. रमेश उर्फ तिम्म्या महादेव देवकिरी (व. २२, रा. मुळा नगर, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सांगवी पोलिसांनी सराईत मोबाईल चोराला अटक केली

दाखल गुन्ह्यातील मोबाईल हा जुन्या सांगवी परिसरातील असल्याचे तांत्रिक तपासात समोर आले होते. त्यानुसार पोलीस शिपाई दीपक भिसे, अरुण नरळे यांनी सांगवी परिसरात जाऊन आरोपी रमेशकडे चौकशी केली. संबंधित मोबाईलचे बिल मागितले तेव्हा, रमेशने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याशी अधिक चौकशी केली असता, आपण पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून पहाटेच्या सुमारास अनेक मोबाईल चोरी केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर रमेशवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जप्त केलेले मोबाईल

सांगवी पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचे २४ मोबाईल हस्तगत केले आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस कर्मचारी खोपकर, बोऱ्हाडे, गुत्ती, केंगळे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Intro:mh_pun_05_crime_av_mhc10002Body:mh_pun_05_crime_av_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड परिसरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत मोबाईल चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचे २६ मोबाईल हस्तगत केले आहेत. रमेश उर्फ तिम्म्या महादेव देवकिरी वय-२२ रा.मुळा नगर जुनी सांगवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर ची कामगिरी सांगवी पोलिसांनी केली आहे. दाखल गुन्ह्यातील मोबाईल हा जुन्या सांगवी परिसरात सुरू झाल्याचे तांत्रिक तपासात समोर आले. त्यानुसार पोलिस शीपाई दीपक भिसे, अरुण नरळे यांनी सांगवी परिसरात जाऊन आरोपी रमेशकडे चौकशी केली. संबंधीत मोबाईल चे बिल मागितले तेव्हा, आरोपी रमेश ने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून पहाटे च्या सुमारास अनेक मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून १ लाख २६ हजार रुपयांचे २४ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस कर्मचारी खोपकर, बोऱ्हाडे,गुत्ती, केंगळे आदी कर्मचार्यांनी केली आहे. Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details