महाराष्ट्र

maharashtra

पुणे रेल्वे स्थानकाने केले 96 व्या वर्षांत प्रदार्पण

By

Published : Jul 27, 2020, 3:59 PM IST

पुणे रेल्वे स्थानकाला आज 95 वर्षे पूर्ण झाले असून 96 व्या वर्षी या स्थानकाचे आज पदार्पण केले आहे.

pune railway station
pune railway station

पुणे -पुणे रेल्वे स्थानक मागील 95 वर्षांपासून रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी उभे आहे. आज रेल्वे स्ठानकाचा वर्धापनदिन असून 96 व्या वर्षात रेल्वे स्थानकाने पदार्पण केले आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकाचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा, स्थानक प्रबंधक सुनिल ढोबळे आदी उपस्थित होते.


गेल्या अनेक वर्षांतील नैसर्गिक आपत्कालीन परिस्थिती व मध्यंतरी लागलेली आग या घटना पचवीत आजही पुणे रेल्वे स्थानकाची ही इमारत दिमाखात प्रवाशांच्या सेवेसाठी उभी आहे. देशात अनेक पुरातन वास्तु आहेत, ज्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे. त्याच पद्धतीने या वास्तुची निगा राखण्यात यावी, असे मत हर्षा शहा यांनी व्यक्त केले.

27 जुलै, 1925 ला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानक सुरु करण्यात आले. त्यावेळी पुणे ते मुंबई (पूर्वीचे बॉम्बे), अशी मेल सुरू करण्यात आली होती. आज या स्थानकाला 95 वर्षे पूर्ण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details