महाराष्ट्र

maharashtra

Pune Police Team in Jalgaon : भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांच पथक जळगावात दाखल

By

Published : Jan 9, 2022, 1:49 PM IST

Girish Mahajan
गिरीश महाजन ()

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे. ( Pune Police Team in Jalgaon ) जळगावात 'या' पाच संशयितांच्या घरी चौकशी सुरू असून कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले आहे.

पुणे - भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan ) यांच्यावर पुण्यात असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहे. ( Pune Police Team in Jalgaon ) जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल -

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी रविवारी पहाटेपासून पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दाखल झालं आहे. जळगावात पाच संशयितांच्या घरी चौकशी सुरू असून कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले आहे. पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्त्वात पाच पथके तयार करण्यात येऊन या पथकाकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा -आरएसएस मुख्यालयाची रेकी.. कलम 370 हटवल्याने दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले, त्यातूनच हा प्रकार - गिरीश महाजन

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details