महाराष्ट्र

maharashtra

आता काश्मीरमध्ये घुमणार 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष! पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंचाचा प्रयत्न

By

Published : Aug 16, 2019, 7:06 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये गणेश उत्सव साजरा केला जावा, यासाठी पुण्यातील पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंच प्रयत्न करत आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आता काश्मीरमध्ये घुमणार 'गणपती बाप्पा मोरया'! पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंच कडून प्रयत्न

पुणे - जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले आहे. भारतीयांमध्ये विचारांची, संस्कृतीची देवाण-घेवाण करण्याची मानसिकता आहे. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये गणेश उत्सव साजरा केला जावा, यासाठी पुण्यातील पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंच प्रयत्न करत आहे.

आता काश्मीरमध्ये घुमणार 'गणपती बाप्पा मोरया'! पुणे-काश्मीर सांस्कृतिक मंच कडून प्रयत्न
महाराष्ट्राची खास ओळख असलेला गणेशोत्सव यावर्षी दोन सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने काश्मीरमध्ये सुख-शांती वाढावी. तेथील विकासाची गती वाढावी म्हणून महाराष्ट्राचा हा गणेशोत्सव काश्मीरमध्ये देखील साजरा व्हावा,अशी सांस्कृतिक मंचाची इच्छा आहे. काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मदत घेतली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे श्याम देशपांडे यांनी सांगितले.
गणेशोत्सव करण्याची परवानगी मिळाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख व काश्मीरचे राज्यपाल यांच्या हस्ते या उत्सवाची सुरुवात करण्याचे सांस्कृतिक मंच नियोजन आहे. संस्कृतीत मंचासोबत 'पनून काश्मीर' संस्थेचे राहुल कौल हे देखील काश्मीरमध्ये गणेशोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
Intro:370 कलम हटवल्यानंतर आता काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा केला जावा यासाठी पुणे काश्मीर सांस्कृतिक मंच कडून प्रयत्नBody:mh_pun_02_ganpati_kashmir_avb_7201348

Anchor
काश्मीरच्या प्रगती मध्ये खेळ ठरत असलेले कलम 370 दूर झाले आता काश्मिरी बांधव आणि भारतामधील इतर राज्यातील नागरिक एकत्र येणारच आहेत भारतीयांमध्ये विचारांची संस्कृतीची देवाण-घेवाण करणे सर्वांना समान संधी देत त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची मानसिकता आहे आणि त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये आता गणेश उत्सव साजरा केला जावा यासाठी पुण्यातील पुणे काश्मीर सांस्कृतिक मंच कडून प्रयत्न केले जात आहेत महाराष्ट्राची खास ओळख असणारा गणेशोत्सव यावर्षी दोन सप्टेंबरपासून सुरू होत आहे या विघ्नहर्त् याच्या आशीर्वादाने काश्मीरमध्ये सुख-शांती वाढावी आणि तेथे विकासाची गती वाढावी म्हणून महाराष्ट्राचा हा गणेशोत्सव काश्मीर मध्ये देखील साजरा व्हावा अशी सांस्कृतिक मनाची इच्छा आहे काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालय गृहमंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्याचे संस्कृती म्हणजे प्रयत्न आहेत काश्मीरमध्ये यांचा गणेशोत्सव करण्याची परवानगी मिळाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख तसेच काश्मीरचे राज्यपाल यांच्या हस्ते या उत्सवाची सुरुवात करण्याचं सांस्कृतिक मंच नियोजन आहे आतापर्यंत काश्मीर जनतेचा ठराविक आणि मोजकाच सहभाग सर्व सांस्कृतिक आदानप्रदान मध्ये आहे जो वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं संस्कृतीत मंचचे श्याम देशपांडे यांनी सांगितले त्यांच्यासोबत पनून काश्मीर या संस्थेचे काम करणारे आणि मुलीचे काश्मिरी असलेले राहुल कौल हे देखील काश्मीरमध्ये गणेशोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत पुणे काश्मीर सांस्कृतिक मंच आया काश्मीरमधील गणेशोत्सवाला सरकार मान्यता देणार का हा प्रश्न असून जर सरकारकडून परवानगी मिळाली नाही तर काश्मीरसाठी पुण्यातच गणपती उत्सव साजरा करू असे देखील मंच कडून सांगण्यात आले आहे
Byte शाम देशपांडे
Byte राहुल कौल
Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details