महाराष्ट्र

maharashtra

२० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी ताब्यात; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

By

Published : Dec 23, 2020, 1:29 AM IST

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली. त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 20 हजार रुपये द्यायचे ठरले. तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली...

policeman arrested for taking bribe of 20 thousand rupees
२० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी ताब्यात; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

पिंपरी चिंचवड (पुणे) :शहरातील महिला वाहतूक पोलिसाने लाच घेतल्याचे प्रकरण निवळत असतानाच, सांगवी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याचे समोर आले आहे. बंदोबस्त पुरविण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सांगवी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

शंकर एकनाथ जाधव (वय-56) असे रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली आहे.

बंदोबस्त पुरवण्यासाठी मागितली लाच..

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली. त्यानंतर दोघांमध्ये तडजोड होऊन 20 हजार रुपये द्यायचे ठरले. तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.

रंगेहात पकडले..

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवार ते सोमवार या कालावधीत सापळा लावला. सोमवारी 20 हजारांची लाच घेताना एसीबीने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधवला रंगेहाथ पकडले.

वरिष्ठ अधिकारी निर्दोष असल्याचं स्पष्ट..

दरम्यान, या प्रकरणात सांगवी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांचा हात असल्याचे म्हटले जात होते. एसीबीने सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बराच वेळ चौकशी केली. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी दोषी नसून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोषी असल्याचे आढळल्यानंतर याबाबत मंगळवारी गुन्हा दखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :मनसे पदाधिकाऱ्याने मागितली २० लाखांची खंडणी; रक्कम घेताना रंगेहात अटक!

ABOUT THE AUTHOR

...view details