पुणे :आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी एनआयए आणि आयबीने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये एकाला अटक केली आहे.
जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा व आयबी यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले आहे. यावेळी कोंढवा पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक संजय मोगले (गुन्हे), गोपनीय अंमलदार, तपास पथक स्टाफ, महिला पोलीस अंमलदार हजर होतो. ही कारवाई शांततेत पार पाडलेली आहे.
संयुक्तरित्या छापा मारून अटक केली :आज रोजी सकाळी 04 वाजून 05 मिनिटांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटी, नुरणी कब्रस्तान जवळ, चौथा मजला, फ्लॅट नं. 42 ए विंग कोंढवा पुणे येथे जुबेर शेख (वय 39 वर्ष धंदा नोकरी) यास चौकशी कमी राष्ट्रीय तपास यंत्रणा व इंटेलिजेन्स ब्यूरो टीम यांनी संयुक्तरित्या छापा मारून ताब्यात घेतले. तसेच काही महत्वाचे कागदपत्र पुढील तपासकरिता ताब्यात घेण्यात आले. कारवाईच्या वेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...