महाराष्ट्र

maharashtra

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : Jan 9, 2021, 5:19 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले लाखो पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आले आहेत.

महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे -उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले लाखो पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील बदाऊ जिल्ह्यात 3 जानेवारीला एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून, त्या महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

योगी आदित्यनाथ राज्याची जबाबदारी घेण्यात अयशस्वी

उत्तर प्रदेशातील महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे. योगी या शब्दामागे फार मोठी जबाबदारी असते, मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्याची जबादारी घेण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार सातत्याने वाढत आहेत, योगी राज हे भोगी राज झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details