महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar : शरद पवारांनी सायरस पुनावला यांच्यासोबतचा सांगितला शाळेतील किस्सा, म्हणाले की, 'आम्ही 36 ते 40 मार्क...'

By

Published : Jan 8, 2023, 5:55 PM IST

पुण्यातील भारती विद्यापीठ येथे डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायरस पुनावाला यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा (Sharad Pawar recalled his school memories with Cyrus Punavla ) दिला. ते म्हणाले की, आम्ही दोघांनी एका गोष्टीत सातत्य ठेवले ते म्हणजे कॉलेजमधून बाहेर पडेपर्यंत आम्ही दोघांनी 36 ते 40 च्या पुढे कधी मार्क मिळवले नाही. आणि ते 36 ते 40 चे जतन आम्ही कायम ठेवले. (NCP Sharad Pawar in Pune)

Sharad Pawar
शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सायरस पुनावला यांच्यासोबतच्या शाळेतील आठवणींना उजाळा देताना

पुणे : आज पतंगराव कदम यांच्या नावाने जो पुरस्कार दिला गेले ते सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला हे जेव्हा 9 ते 10 वर्षाचे होते. तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहे. आदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला आम्ही दोघेही एका वर्गात (school memories with Cyrus Punavla) शिकलो. आमच्या दोघांचा वैशिष्ट्य हे होत की अभ्यासात लक्ष दिले नाही. आम्ही अभ्यास सोडून बाकीच्या क्षेत्रात अधिक लक्ष दिले. त्यामुळे मी एक गोष्ट कटाक्षाने सांगतो की आम्ही दोघांनी एका गोष्टीत सातत्य ठेवल की कॉलेज मधून बाहेर पडे पर्यंत आम्ही दोघांनी 36 ते 40 च्या पुढे कधी मार्क मिळवले नाही. आणि ते 36 ते 40 च जतन आम्ही कायम ठेवले, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar recalled) यांनी त्यांच्या आणि सायरस पुनावाला यांच्या मैत्रीला उजाळा दिला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ येथे डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. (NCP Sharad Pawar in Pune)

आदर पुनावाला पुरस्काराने सन्मानित : पुण्यातील भारती विद्यापीठ येथे डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सचा उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे उपस्थित होते. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना प्रथम डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पतंगराव कदमांचा कार्याचा उल्लेख : पवार पुढे म्हणाले की, पतंगराव कदम यांचा आज जन्मदिवस असून कदम हे अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. सांगली जिल्ह्यातील एका गावातून आले. रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत ते शिकले त्यांनतर पुण्यात आले आणि भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली. पतंगराव कदम यांनी उभे केलेले काम पाहताना तुम्हा-आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. पतंगराव यांचा अनेक वर्षाचा कालखंड रयत शिक्षण संस्थेत गेला. 50 वर्षांपासून मी त्या संस्थेची जबाबदारी घेतलो आहे. या काळात ते आमचे खंदे समर्थक होते. त्यांनी त्यांची रयतशी असलेली बांधिलकी सोडली नाही. असे देखील यावेळी पवार म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटचा गौरव : तसेच आज आज डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार ज्यांना देण्यात आले ते आदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटने एक मोठं नाव लौकीक केलं आहे. जगात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. जगात जवळपास 160 देशात पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. आदर पूनावाला यांनी हे सर्व करत असताना सामाजिक भान राखण्याची देखील त्यांनी काळजी घेतली आहे. शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी जवळपास 100 हुन अधिक वाहने त्यांनी पुणे महानगरपालिकेला दिली आहेत, अस देखील यावेळी पवार म्हणाले.

भारती विद्यापीठाचे कौतुक : आज घडीला संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणे गरजेचे आहे. भारती विद्यापीठ त्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आहे. रयत शिक्षण संस्थेत ज्या सेवाभावी विचाराचे अध्यापक आहेत तसेच भारती विद्यापीठमध्येही आहेत. या संस्थेतील अध्यापक देशाला उपयुक्त असणारे कार्य करतील, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details