महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये श्वानाला चौथ्या मजल्यावरून फेकले

By

Published : Dec 15, 2020, 4:21 PM IST

सांगवीमध्ये सात महिन्याच्या श्वानाला चौथ्या मजल्याच्या टेरिसवरून फेकून दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

dog
श्वान

पिंपरी-चिंचवड(पुणे) -शहरातील सांगवीमध्ये सात महिन्याच्या श्वानाला चौथ्या मजल्याच्या टेरिसवरून फेकून दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरीनजहाँ विसाल शेख यांनी तक्रार दिली आहे.

श्वानाचे तिन्ही पाय फॅक्चर झाले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेख यांच्या घराच्या परिसरात संबंधित श्वान फिरत असे. ते, दररोज त्याला भाकर, दूध देत असत. मात्र, शनिवारी सकाळी श्वान न आल्याने तक्रारदार या चिंतेत होत्या. तेवढ्यात दुपारच्या सुमारास घराच्या जवळून श्वान विव्हळत असल्याचा आवाज आला. तेव्हा पाहिले असता श्वानाचे तीन पाय हे फॅक्चर असल्याचं समोर आले. तसेच रक्तही येत होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

श्वानाला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला

दरम्यान, तक्रारदार यांनी श्वानाला रुग्णालयात घेऊन गेल्या, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून शेजारी असणाऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून सात महिन्याच्या श्वानाला फेकून दिले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या अमानुष घटनेमुळे त्या दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details