महाराष्ट्र

maharashtra

Navratri 2022 : दामिनी पथकांच्या दुर्गा कशा काम करतात? पाहा स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून

By

Published : Sep 29, 2022, 11:36 AM IST

Navratri 2022
दामिनी पथक ()

समाजामध्ये अनेक अशा तक्रारी असतात ज्या पोलिसांपर्यंत न जाता अनेक महिला वरती अन्याय होतो . त्या महिलांच्या मदतीला कोणी येत नाही. पुणे पोलिसांच्या दामिनी पथक मात्र पुण्यातील महिलाच्या संरक्षणासाठी आणि तक्रार निवारणासाठी सदा सक्षम ( Damini Squad for Women Protection ) असतं. त्यासाठीच्या दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

पुणे -समाजामध्ये अनेक अशा तक्रारी असतात ज्या पोलिसांपर्यंत न जाता अनेक महिला वरती अन्याय होतो . त्या महिलांच्या मदतीला कोणी येत नाही. पुणे पोलिसांच्या दामिनी पथक मात्र पुण्यातील महिलाच्या संरक्षणासाठी आणि तक्रार निवारणासाठी सदा सक्षम ( Damini Squad for Women Protection ) असतं. त्यासाठीच्या दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुणे पोलीस अंतर्गत असलेले हे दामिनी पथक हे शाळा कॉलेज विविध धार्मिक उत्सव यामध्ये सुद्धा पेट्रोलिंग करत असते. यामध्ये काही तक्रारी घटना गुन्हे घडत असतील तर त्याचे निवारण करण्याचे काम या सगळ्या महिला दुर्गा करतात ज्या दामिनी पथक आहे. त्यांच्या कामाची पद्धत काय त्यांना काय आव्हाने असतात पाहूया हा स्पेशल ( How Damini squad work) रिपोर्ट.

दामिनी पथक

पुणे विद्येचे माहेरघर -पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आयटी हब आहे. आणि यामध्ये येणाऱ्या तरुण-तरुणीचा समावेश जास्त आहे. त्याचबरोबर महिलांचाही समावेश जास्त आहे. त्या सर्वांचं संरक्षण त्यांना येणाऱ्या अडचणी त्या जर अडचणीत सापडल्या तर त्यांनी कुणाला कॉल करावा यासाठी पुण्याचे हे दामिनी पथक सज्ज असतात नेमकं या कशा कार्य करतात दामिनी पथकातील महिला.

33 दामिनी काम करतात - पुणे शहरातील एकूण पोलीस स्टेशन मध्ये शहरात पूर्ण 33 दामिनी या काम करतात. त्यांच्या कामाचे स्वरूप महिलांचे प्रश्न असतील. कॉलेज वस्तीग्रह असतील त्या ठिकाणी जाणे त्यांच्यामध्ये दामिनी पथकांचे कामाचे स्वरूप सांगणे जनजागृती करणे कायद्याची माहिती देणे .काही तक्रार असेल तर दामिनी पथकांना कशाप्रकारे सांगता येईल .आणि आपल्याला मदत घेईल हे सगळे काम या दामिनी पथकातील या महिला करतात. यामध्ये स्त्री पती पत्नीअसेल भाऊ भावांचा वार असेल कौटुंबिक भागातील सर्वांचा समावेश निर्जन महीला असेल, गर्दीच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास असेल, यांवर अंकुश करण्यासाठी या सगळ्या दामिनी काम करतात.

कोरोना काळामध्ये उल्लेखनीय काम -प्रत्येकाचे या दामिनी पदकांमधील अनुभव एकत्र आव्हानात्मक आणि वेगवेगळ्या आहेत. अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा या या दामिनी पथकाने उल्लेखनीय काम करत एका महिलेला टॉयलेटमध्ये जी महिला पडलेली होती तिला बाहेर काढलं, तिला दवाखान्यात नेण्यात आलं, तिला हवी ती मदत देण्यात आली ,ज्यावेळेस कोरोना काळात ही सर्व करायला कोणी तयार येत नव्हतं त्यावेळेस या स्वतः दामिनी पथकातल्या महिला पोलिसांनी मदत केली आहे. महिला सहाय्यक कक्षातर्फे दामिनी पथकाचे काम चालतं दामिनी पथकाचा एक महिला हेल्पलाइन 109 नंबर वरती कॉल केल्यानंतर हा कॉल कंट्रोलला जातो. कंट्रोल हून संबंधित विभागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जातो. ठिकाणाहून संबंधित दामिनींना कॉल केला जातो आणि त्यानंतर ती दामिनी तात्काळ त्या ठिकाणी मदतीसाठी पोहोचत असते.

आव्हानात्मक कामे -या दामिनी खरंतर फार आव्हानात्मक काम करत ( Challenging work of Damini squad ) असतात. अनेक प्रकारचे अनेक गुन्हे आणि अनेक तक्रारी यांच्याकडे असतात. प्रत्येकाची वेगवेगळी तक्रार आहे. कधी नवरा बायकोचे भांडण, मुलगा घरी सोडून पळून आला असेल , कधी प्रेमभंग झाला म्हणून भांडण झाले,आत्महत्याच प्रवर्त झाले असेल तिला आत्महत्या पासून दूर करणे एखादी व्यक्ती आत्महत्या करत असेल तर तिचं मन वळवणे असे अनेक आव्हानात्मक काम आहे. कधी कधी महिला ड्रिंक करून पडतात त्यांना उचलून घेणे ,कधी कधी काही ठिकाणी तोंडातून फेस येतो तो चक्कर येऊन पडतो, त्यांना उचलून दवाखान्यात नेणे ,तसेच लहान मुलं असतात जे बाहेर सोडले जातात त्यांना पकडून त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवणे. एखाद्या वेळेस एखाद्या शहरातून एखादी महिला मिसिंग झाली असेल ,ती या शहरांत याची माहिती मिळत असेल, तर त्या महिलेचा शोध घेणे. समाजातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक गुन्हे असतात जे पुढे येत नाहीत किंवा त्याच्या तक्रार येत नाहीत .त्या तक्रारी ऐकून घेणे त्यांचे त्या स्तरावर तीच निरसन करण्याचे काम हे दामिनी पथक करतात. तिथेच झालंच नाही तर पुढील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो .

अनुभव आणि जबाबदारी-वेगवेगळ्या दामिनींचे वेगवेगळ्या अनुभव आणि आव्हान आहे जी फार आव्हानात्मक आहेत हे सगळं होत असताना, एक महिला म्हणून सातत्याने उल्लेखनी काम करणं . हे करत असताना कधी कधी जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये या महिला कर्तव्याला प्राधान्य ( Experience and Responsibilities of Damini squad ) देतात. आपले सगळे कौटुंबिक काम बाहेर ठेवतात .आला कॉल की लगेच सगळ्या महिलांच्या मदतीला जातात. खरंतर ह्या सगळ्या दुर्गा आहेत ज्या खऱ्या दुर्गांचे संरक्षण करतात .काय अनुभव असतात ?काय यांना आव्हान असतात ?आणि कशा पद्धतीने काम करतात. आणि जेणेकरून समाजामधील महिला सुरक्षित राहिली पाहिजे .तिला छोट्या छोट्या कारणासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार नाही. त्याचा उत्तर त्याच ठिकाणी प्राप्त होईल असं कामकरता आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details