महाराष्ट्र

maharashtra

Hindu Jan Aakrosh Morcha : धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद कायद्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

By

Published : Jan 22, 2023, 4:32 PM IST

धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद कायदे करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आज पुण्यात करण्यात आले. या मोर्चात हजारो हिंदू नागरिकांसह आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांनी या मोर्चात हजेरी लावली.

Etv Bharat
Etv Bharat

लव्ह जिहाद कायद्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

पुणे -धर्मांतर, गोहत्या, लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज हिंदू जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात हजारो हिंदू नागरिक मोर्च्यामध्ये सहभागी झाले आहे. यावेळी तेलंगणाचे आमदार राजा भैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लव जिहाद कायदा करावा - ते म्हणाले आज महाराष्ट्र नव्हे तर देशाचे हिंदू म्हणत आहे की धर्मांतर, गोहत्या, लव जिहाद यावर कायदा व्हावा अस यावेळी राजा भैया म्हणाले. पुण्यात आज लाल महाल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत सकल हिंदू समाजाच्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो हिंदू नागरिक हे मोर्चे मध्ये सहभागी झाले आहे. या मोर्च्यात आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई हे देखील सहभागी झाले आहे.

हिंदू मुलींची फसवणुक -लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारका पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी राजा भैया म्हणाले की, आज देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना गोड बोलून फसविल जात आहे. त्यांचे 35 तुकडे करून फेकून दिलं जात आहे. भारतात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदी मुलींचे बलात्कार केले जात आहे.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच -छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावे. जर यावर कायदा झाला नाही तर येत्या काळात या राज्यात नव्हे तर देशातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे विराट मोर्चे काढले जाणार आहे असे देखील यावेळी राजा भैय्या यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे की ,धर्मवीर म्हणायचे यावर राजा भैय्या म्हणाले की, या मुद्द्यावरून जर कोणी राजकारण करत असेल तर, ते चुकीचे असून राजकारण करण्यासाठी दुसरे विषय आहे. पण, जर कोणी यावर राजकारण करत असेल तर लोकांनी अशा राजकारणीवर बहिष्कार घातला पाहिजे. तसेच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. मी देखील धर्मवीरच म्हणणार आहे असे देखील राजा भैया यांनी सांगितले.

हेही वाचा -Sanjay Raut News : विरोधकांनी भारत जोडो यात्रेत केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details