महाराष्ट्र

maharashtra

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By

Published : Sep 7, 2020, 6:34 PM IST

शेतातील शेतमाल शेतातच सडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर काही भागात शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतमाल फेकून देण्याची वेळ आली होती. तर दुसरीकडे मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेल्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले. त्यातुनही उभारी घेत शेतकरी कसाबसा उभा रहात असताना दोन दिवसापासून पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सुरू झाल्या आहे. यामध्ये तरकारी मालाचे नुकसान होत आहे.

farmer worry due to heavy rain in pune district villeges
पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

राजगुरुनगर (पुणे) - गेल्या दोन दिवसांपासून शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामध्ये शेतमालासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

मागील सहा महिन्यापासून कोरोना महामारीच्या संकटात शेतातील शेतमाल शेतातच सडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर काही भागात शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतमाल फेकून देण्याची वेळ आली होती. तर दुसरीकडे मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेल्या फळबागांचेही मोठे नुकसान झाले. त्यातूनही उभारी घेत शेतकरी कसाबसा उभा रहात असताना दोन दिवसापासून पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सुरू झाल्या आहे. यामध्ये तरकारी मालाचे नुकसान होत आहे.

शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ऊस, बाजरी, कारली, टोमॅटो, पपई, केळी, अशी अनेक पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या भांडवली खर्चातून उभारलेली पिके निसर्गाच्या लहरीपणामुळे जमिनदोस्त होत असल्याने पुन्हा एकदा शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे शासकिय पातळीवर तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details