महाराष्ट्र

maharashtra

DRDO Honey Trap: कुरुलकरने हनी ट्रॅपमध्ये अडकून महिलेसोबत पाहिली मॅच अन् विदेशातील डान्स बारमध्ये लुटली मजा

By

Published : May 14, 2023, 12:29 PM IST

Updated : May 14, 2023, 12:44 PM IST

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याने हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर अनेक कारनामे केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर प्रत्यक्ष पाकिस्तानी तरुणीची भेट घेऊन डान्सबारमध्ये गेल्याची माहिती समोर येत आहे.

डीआरडीओ हनी ट्रॅप
DRDO Honey Trap

पुणे -एटीएसकडून सुरू असलेल्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. सुत्राच्या माहितीनुसार एटीएसकडून प्रदीप कुरुलकर याच्या ई मेलची तपासणी केली असता त्यात कुरुलकरने पाकिस्तानी तरुणीसोबत विदेशात जाऊन भारत-पाक क्रिकेट सामना पाहिल्याची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. एवढेच नाही तर त्या तरुणीसोबत विदेशातील डान्स बारमध्ये देखील मजा केली असल्याचे तपासात समोर आले आहे.

हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप असल्याने पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचा (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकरला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. अटकेतील कुरुलकरला अटक केल्यानंतर 9 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली होती. त्याला पुण्यातील शिवाजी नगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 15 तारखेपर्यंत एटीएस कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानातून आलेले मेल तपासले असता त्यात धक्कादायक बाबी समोर येत आहे. कुरुलकर हा सरकारी पासपोर्टवर सहा देशांत जाऊन आला आहे. या दौऱ्यात त्याने त्या तरुणीसोबत भारत पाक सामना पाहिल्याचे समोर आले आहे. आता तपास यंत्रणेकडून भारत-पाक क्रिकेट सामन्यांचे रेकॉर्डिंगदेखील तपासले जात असल्याचे सूत्राने सांगितले.


ई-मेलवरील संभाषणदेखील उजेडात-तपास यंत्रणेकडून कुरुलकरच्या मेलची तपासणी केली असता ई-मेलमध्ये क्रिकेट मॅच आणि खेळ या पाच ओळींचा मजकूर आहे. आपण आपली मॅच खेळूनंतर डान्सबार मध्येही जाऊन मजा करू असा, निरोप यात लिहिलेला आढळला आहे. याबाबत अधिक तपास हा एटीएसकडून केला जात आहे. हनीट्रॅपमध्ये कुरुलकर हा फक्त सोशल मीडिया व्हॉट्सॲप, फेसबुक याच्यावर संवाद साधत नव्हता. तर कुरुलकर हा ई मेल द्वारेही पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होता. फॉरेन्सिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. ई -मेलवर झालेले संभाषणदेखील उजेडात आले आहे.

विदेशात सहा वेळा भेटी-9 तारखेच्या सुनावणीमध्ये एटीएसकडून काही बाबी पुढे आल्या आहेत. प्रदीप कुरलकर हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटला आहे. त्या महिला नेमके कोण आहे? या महिलेची भेट का झाली? या मागील नेमके कारण काय आहे, याचा तपास देखील एटीएसच्या माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे कुरुलकरने शासकीय पासपोर्टचा देखील वापर हा केला असून त्याची माहिती देखील घेण्यात येत आहे. कुरुलकर हा संपूर्ण काळात सहा देशांमध्ये जाऊन आला आहे. तेव्हा तो कोणाशी भेटला का? याचा तपास देखील एटीएसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Last Updated :May 14, 2023, 12:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details