महाराष्ट्र

maharashtra

बारामतीत "सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटर"ची निर्मिती, 16 जूनला उद्घाटन

By

Published : Jun 15, 2022, 4:33 PM IST

भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, ॲग्रीकल्चरल गॅलरी,३डी थिएटर,इनोव्हेशन हब,व्हर्चुअल रियालिटी,ऑगमेंटेड रियालिटी यांसारखे तंत्रज्ञान अनुभवायला मिळेल. जपान,कोरिया,चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरूण संशोधक ऑटोमोबाईल,टेलीकॉम,होम अप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तरोत्तर भरीव प्रगती करीत आहेत. याच विचारातून कोडींग, डेटा सायन्स,डिजिटल मार्केटिंग,डिजाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही या सेंटरमध्ये मिळेल याची व्यवस्था केली आहे. यातून स्वदेशी उत्पादन करणारे भावी तंत्रज्ञ आणि संपूर्ण जगाला पुरवठा करतील अशा कंपन्या भारतात उभ्या करणारे भावी उद्योजक तयार होतील.

dedication of science and innovation activity center on june 16 at baramati in pune
सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटर

बारामती (पुणे) - राज्यभरातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी देऊन त्यांच्या संशोधनात्मक नवकल्पना विकसित करण्यासाठी येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन 16 जूनला ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर,उद्योजक गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे,राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,भारतातील सर्वात तरूण शास्त्रज्ञ गोपालजी हे उपस्थित असणार आहेत अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

“३ई” तत्वावर हे सायन्स सेंटर कार्यरत - विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी संधी देऊन त्यांच्यातील नवकल्पना विकसित करण्यासाठी एक्सपोजर-एक्सपेरीमेंट-एक्सप्लोरेशन या “३ई” तत्वावर हे सायन्स सेंटर कार्यरत असणार आहे. सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान क्षेत्रातील नामांकित संस्थामध्ये नेऊन विज्ञानाबद्दलची आवड वाढवणे आणि संशोधन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी शाळांना सहज करता येण्याजोग्या प्रयोग साहित्याच्या किटचे वाटप आणि प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व सोयींचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्याना व्हावा यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट नेहमीच प्रयत्नशील असणार आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना याचा लाभ - या प्रकल्पासाठी राजीव गांधी सायन्स टेक्नोलॉजी कमिशन (महाराष्ट्र शासन)आणि टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे. ग्रामीण भागातील एक अद्ययावत सायन्स सेंटर बारामती येथे मंजूर झाले. हे सेंटर केवळ ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टपुरते मर्यादित राहणार नसून पुणे आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना याचा लाभ होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा येथे तयार करण्यात आल्या आहेत. हे सेंटर मिळण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे,संस्थेचे सल्लागार प्रा.संतोष भोसले,शारदाबाई पवार विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक सुर्यकांत मुंढे, सेंटरच्या व्यवस्थापक हीना भाटीया,प्रा.सोनाली सस्ते, प्रा.जया तिवारी यांनी आयोगासमोर आणि टाटा ट्रस्टच्या समितीसमोर सादरीकरण केले आणि ग्रामीण भागातील एक अद्ययावत सायन्स सेंटर बारामती येथे मंजूर झाले, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिले.

विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अनुभवायला मिळेल -भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, ॲग्रीकल्चरल गॅलरी,३डी थिएटर,इनोव्हेशन हब,व्हर्चुअल रियालिटी,ऑगमेंटेड रियालिटी यांसारखे तंत्रज्ञान अनुभवायला मिळेल. जपान,कोरिया,चीन या देशांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षणव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील तरूण संशोधक ऑटोमोबाईल,टेलीकॉम,होम अप्लायन्सेस या क्षेत्रात उत्तरोत्तर भरीव प्रगती करीत आहेत. याच विचारातून कोडींग, डेटा सायन्स,डिजिटल मार्केटिंग,डिजाईन थिंकिंग या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही या सेंटरमध्ये मिळेल याची व्यवस्था केली आहे. यातून स्वदेशी उत्पादन करणारे भावी तंत्रज्ञ आणि संपूर्ण जगाला पुरवठा करतील अशा कंपन्या भारतात उभ्या करणारे भावी उद्योजक तयार होतील.

ऑगमेंटेड रियालिटी येथे आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील - नेहरू सायन्स सेंटर(मुंबई)होमी भाभा विज्ञान केंद्र(मुंबई) अगस्त्या इंटरनॅशनल(कुप्पम)मुक्तांगण एक्सप्लोरेटरी(पुणे) कॅडमॅक्स (नाशिक) यांच्यासह रोबोटिक्स,कोडींग,व्हर्चुअल रियालिटी,ऑगमेंटेड रियालिटी इथे आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details