महाराष्ट्र

maharashtra

कुरकुंभ येथे मटका घेणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Dec 9, 2020, 10:15 PM IST

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला असून 4 हजार 210 रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दौंड पोलीस ठाणे
दौंड पोलीस ठाणे

दौंड (पुणे) -तालुक्यातील कुरकुंभ गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलालगत पुणे बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर विजय ड्राय क्लिनिंगजवळ पत्र्याच्या शेडमध्ये अवैध मटका सुरू होता. याची माहिती पोलिसांनी मिळ्यानंतर पोलिसांनी मटका घेणाऱ्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कुरकुंभ येथे राहुल सोपान दोडके (वय 33 वर्षे, रा. कुरकुंभ ता.दौंड, जि.पुणे) हा व्यक्ती अशोक चव्हाण (रा.भीमनगर दौंड जि.पुणे) यांच्या मागणीवरून त्यांच्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होता. त्याच्याकडे 4 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे. यावरून दोघांवर मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे पोलीस अधिकारी दिपककुमार वाईकर यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details