महाराष्ट्र

maharashtra

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जमाव बंदी

By

Published : Nov 7, 2020, 10:50 PM IST

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला असून, येत्या 5 डिसेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

Crowd ban in Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमध्ये जमाव बंदी

पिंपरी चिंचवड -शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. येत्या 5 डिसेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात कलम 144 अर्तंगत जमाव बंदी लागू केल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी पोलीस आयुक्तांनी दिला आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षाच्या प्रचाराचे कोणेतेही साहित्य लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चा काढणे, नव्या योजनांची घोषणा करणे या सर्व गोष्टींना प्रतिबंध असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी दिली.

5 डिसेंबरपर्यंत जमाव बंदीचा आदेश

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. निवडणूक काळात आचारसंहितेच पालन व्हाव, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. 5 डिसेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details