महाराष्ट्र

maharashtra

सोनसाखळी चोर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात; १६ तोळे सोने आणि दोन दुचाकी हस्तगत

By

Published : Nov 29, 2019, 10:23 PM IST

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचे 16 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

chain snatcher arrested in sangvi
सोनसाखळी चोर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे - सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचे 16 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

सोनसाखळी चोर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात
महेश तुकाराम माने (वय-21) आणि गणेश हनुमंत मोटे (वय-20) अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपी महेश हा चोरी केलेले सोन्याचे दागिने त्याच्या आई मार्फत सराफाला विकत होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस कर्मचारी अरुण नरळे यांना संबंधित आरोपी पिंपळे निलख येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, अरुण नरळे यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला; आणि आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी अधिक चौकशी दरम्यान आरोपी गणेश मोटे याचे देखील नाव समोर आले.

त्याच्याकडून सोनसाखळी चोरीचे दहा तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत.

Intro:mh_pun_03_avb_chain_snaching_mhc10002Body:mh_pun_03_avb_chain_snaching_mhc10002

Anchor:- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. महेश तुकाराम माने वय-२१ आणि गणेश हनुमंत मोटे वय-२० असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपी महेश हा चोरी केलेले सोन्याचे दागिने आई मार्फत सराफाला विकत असे यामुळे त्याच्यावर संशय येत नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी अरुण नरळे यांना माहिती मिळाली की आरोपी महेश हा पिंपळे निलख येथे येणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, अरुण नरळे यांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. आरोपी महेश माने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली, तेव्हा आरोपी गणेश मोटे याचे नाव समोर आले. त्याच्या साथीने संबंधित गुन्हे केल्याच आरोपी महेश ने सांगितले.

त्यांच्याकडून सोनसाखळीचे चोरीचे दहा तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. ऐकून ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोघे संगनमत करून रात्रीच्या वेळेत सोनसाखळी चोरी करत होते. सोन्याचे दागिने दोन्ही आरोपींचा घरी मिळाले असून काही सोने सोनारकडे मिळाले आहे. महेश हा त्याच्या आई ला घेऊन सोनारकडे चोरीचे सोने विकत त्यामुळे सोनाराला संशय येत नव्हता. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुळीग,पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजने, रोहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, शशिकांत देवकांत, विनायक देवकर, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंत गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

बाईट:- ज्ञानेश्वर साबळे- वरिष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details