महाराष्ट्र

maharashtra

Mahesh Landge News: पुणे जिल्ह्याचे विभाजन करा- आमदार महेश लांडगेंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

By

Published : May 16, 2023, 9:28 AM IST

पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे. तसेच, पिंपरी- चिंचवडच्या भागातील परिसराला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावे, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

BJP MLA Mahesh Landge
भाजप आमदार महेश लांडगे

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. त्यांनी विविध विकास कामांचे उदघाटन करत लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याच्या विभाजणाची मागणी केल्याने फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष लागले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी यावर न बोलणे पसंत केले. पिंपरी- चिंचवड शहरात रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा होता.

पुणे जिल्ह्याच्चा विभाजनाची मागणी : त्यांच्या हस्ते विविध विकास कामे आणि लोकार्पण सोहळा पार पडला. आकुर्डी परिसरातील ग.दि.मा नाट्यगृहाचे लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नाट्यगृहात सर्वांची भाषणे झाली. याच भाषणात भाजप आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याला शिवनेरी हे नाव द्यावे, अशी मागणी फडणवीस यांच्यासमोर केली. यामुळे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात लांडगे यांच्या मागणीचे स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांनी शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय दिले अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत.

पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्याला शिवनेरी हे नाव द्यावे- आमदार महेश लांडगे

शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावे : आता पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी- चिंचवड शहर लगत येणाऱ्या भागाला शिवनेरी जिल्हा म्हणून नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्याचे ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे करण्यात आले. मुंबईचे देखील शहर आणि उपनगर असे दोन जिल्हे करण्यात आले. लोकसंख्येच्या आधारावर पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळे आता पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!

हेही वाचा : Women Policy: सरकार अत्यंत उदासीन असल्याने महिला धोरण थंड बस्त्यात - सचिन अहिर

हेही वाचा : Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी

ABOUT THE AUTHOR

...view details