महाराष्ट्र

maharashtra

Bigg Boss Winner MC Stan : बिगबॉसचा विजेता ठरलेला एमसी स्टॅनचा संघर्षमय प्रवास; जाणून घ्या सविस्तर

By

Published : Feb 13, 2023, 8:40 PM IST

'बिग बॉस हिंदी १६' च्या महाअंतिम सोहळ्यात पुण्यातील सुप्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. रॅपर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. एमसी स्टॅनचा आतापर्यंतचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

बिगबॉसचा विजेता ठरलेला एमसी स्टॅनचा संघर्षमय प्रवास

पुणे : बिग बॉस हा रियालिटी शो भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गेले चार महिने बिग बॉसचा १६ वा सिझन रंगला होता. अत्यंत चुरशीच्या फिनालेमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. यावर्षी अंतिम पाचमध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि शालिन भनोट पोहोचले होते. रविवारी संपन्न झालेल्या फायनलमध्ये प्रत्येक फायनालिस्टला वाटत होते की बिग बॉसची ट्रॉफी आपलीच होणार पण पाच तास झालेल्या या कार्यक्रमानंतर पुण्यातील सुप्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे.

एमसी स्टॅन विजयी : 1 ऑक्टाेंबर 2022 ला बिग बॉसचे 16वे पर्व सुरु झाले. अनेक लहान मोठ्या कलाकारांनी या पर्वात सहभाग घेतला होता. हे नवीन पर्व अनेक वाद आणि भांडणांमुळे गाजले यातही बिग बॉस कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर, या मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून एमसी स्टॅन याने बिग बॉसच्या विजेत्यांची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

स्टॅनचा आतापर्यंतचा प्रवास : पुण्यातील ताडीवाला रोड येथील पंचशिल बुद्ध विहार येथील रेल्वे कॉटर येथील चाळीत अल्ताफ तडवी उर्फ एमसी स्टॅन याचा जन्म झाला. तो तेथे असलेल्या झोपडपट्टी वस्तीतच लहानाचा मोठा झाला. वडील हे रेल्वे नोकरीला असल्याने एमसी स्टॅन हा शेजारी असलेल्या झोपडपट्टीत मित्रांबरोबर मोठा झाला. सुरूवातीला जेव्हा रॅप करायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या वडिलांना ते आवडते नव्हते. मुलगा काय करतोय काय करत नाही. हे त्यांना कळत नव्हते. एखादा व्यसन लागला की काय अशी भीती त्यांच्यात होती. तेव्हा चाळीत राहणाऱ्या सोनू भाऊ निकाळजे यांनी वडिलांना समजावले. आणि तेव्हा त्यांना वाटले आणि त्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली, असे यावेळी त्याच्या चाळीतील मित्र मंडळींनी सांगितले आहे.

मित्रांमध्ये मोठा जल्लोष : बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात विजेता म्हणून अभिनेता सलमान खान यांनी एमसी स्टॅन याच नाव घेतले तेव्हा आमच्या चाळीत एकच जल्लोष झाला. कारण त्याने केलेली मेहनत आम्ही आगदी जवळून बघितले आहे. जेव्हा तो रॅप करायचा तेव्हा आजूबाजूच्या लोक त्याला रॅप करताना त्रास द्यायचे. त्याला रॅप करू देत नव्हते. तेव्हा आम्ही सर्व मित्र त्यांना समजवायचो आणि तो चाळीतील टेरेस वर त्याच्या मित्रांबरोबर रॅप करायचा. 2018 साला पर्यंत तो आमच्या इथ राहायचा आणि जेव्हा त्याच्या वडिलांची बदली झाली तेव्हापासून तो मुंबईला राहायला गेला आहे, असे देखील यावेळी त्याच्या मित्रांनी सांगितले.


स्टॅनची बिग बॉसमधील कामगिरी : बिगबॉस या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने जेव्हा एमसी स्टॅनचे नाव घेतले तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. एमसी स्टॅन खूप चांगल्याप्रकारे हा खेळ खेळला. ताे कायमच स्वतःच्या डोक्याने आणि विचार करून खेळायचा. त्याने अनेकदा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे बिग बॉसला देखील अनेक प्रश्न विचारले. त्याच्या या हुशारीमुळे आज त्याने बिग बॉसचे विजेतेपद मिळवले आहे. एमसी स्टॅनला या ट्रॉफी सोबतच बक्कळ कॅश प्राईज देखील मिळाले आहे.

हेही वाचा :Devendra Fadnavis Revealed: मोठी बातमी! पहाटेचा शपथविधी शरद पवारांना विचारूनच; फडणवीसांचा गौप्यस्फोट

ABOUT THE AUTHOR

...view details