महाराष्ट्र

maharashtra

जनावरे राखणाऱ्याने केली मालकाच्या अल्पवयीन मुलीची हत्या

By

Published : Dec 9, 2020, 12:16 PM IST

जनावरे राखण्यासाठी असलेल्या 18 वर्षीय तरुणाने मालकाच्या अल्पवयीन मुलीची काठीने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत हत्या झालेल्या मुलीच्या बहिणीने घटनेची हकिगत सांगितल्यानंतर चाकण पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

chakan
chakan

पुणे - चाकण जवळील गोणवडी येथे जनावरे राखण्यासाठी असलेल्या 18 वर्षीय तरुणाने मालकाच्या अल्पवयीन मुलीची काठीने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत हत्या झालेल्या मुलीच्या बहिणीने घटनेची हकिगत सांगितल्यानंतर चाकण पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

चिमुकल्या बहिणीसमोरच हत्या

चाकण जवळील आंबेठाण गोणवडी येथे संबंधित कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे जनावरे राखण्यासाठी माऊली नावाचा मुलगा काम करत होता. तो मूळचा नाशिक येथील असून या कुटुंबासोबत वास्तव्य करून जनावरे राखण्याचे काम करत होता. नेहमीप्रमाणे माऊली जनावरे राखण्यासाठी गोणवडी येथील पडजमिनीत घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत हत्या झालेली अल्पवयीन तरुणी व तिची 6 वर्षीय बहिण सोबत होती. त्यावेळी माऊलीने हातातील काठी तिच्या गळ्यावर आडवी ठेऊन ती जोराने दाबली आणि तिचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला.

हत्येचा गुन्हा दाखल, आरोपी फरार

बहिणीच्या हत्येची घटना 6 वर्षीय बहिणीने समोर पाहिल्यानंतर संपूर्ण हाकिगत कुटुंबीयांना सांगितली. त्यानुसार चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी माऊली हा फरार झाला असून चाकण पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details