महाराष्ट्र

maharashtra

अमोल मिटकरींचे चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज; पाणी न पिता माझ्यासोबत रायगड पायी चढा...

By

Published : Dec 5, 2022, 10:59 AM IST

अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज केले (Amol Mitkari open challenge to Chandrakant Patil ) आहे. पाणी न पिता रायगड पायी चढावा असे आव्हान अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे. अमोल मिटकरींकडून राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे.

amol mitkari
अमोल मिटकरी

पुणे :काल भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या वयात शिवनेरी किल्ला चालत सर केला. त्या राज्यपालांच्या मनात शिवरायांच्या बद्दल अनादर कसा असेल असा सवाल केला. यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान दिलं (Amol Mitkari open challenge to Chandrakant Patil ) आहे.

पाणी न पिता रायगड पायी चढावा : राज्यपाल पायी गेले तर काही उपकार केले नाहीत. चंद्रकांत पाटील जर खरे शिवभक्त असतील तर त्यांनी रायगडावर माझ्यासोबत पाणी न पिता पायी चढवून दाखवावं आणि मग ( Climb Raigad Without Drinking Water Challenge ) सांगावे. राज्यपाल पायी गेले तर काही उपकार नाही केले त्यांनी. हा निव्वळ राज्यपालांना वाचवायचा प्रकार असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी

महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांच्यामार्फत संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढूमध्ये आत्मक्लेश करण्यात येत आहे. यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार अतुल बेनके, आमदार संदीप शिरसागर आदी नागरिक उपस्थित आहे. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्ष्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध जी अनास्था आहे. ती राज्यपाल भगतसिंह कोशारी, सुधांशु त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांच्या तोंडून जनतेने ऐकली आहे. आज आम्ही इथे शिवप्रेमी म्हणून आलेलो आहोत. जस उदयनराजे रायगडावर भाजपचे म्हणून गेलेले नाहीत तर शिवरायांचे एक वंशज म्हणून गेलेले आहेत.अस देखील यावेळी मिटकरी म्हणाले.

वारंवार जाणूनबुजून वक्तव्य :आज आम्ही आत्मक्लेश यासाठी करतोय की जर आम्ही आता शांत बसलो तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील. चुकून वक्तव्य झालं असेल तर समजू शकतो मात्र हे वारंवार जाणूनबुजून केले जात आहे. हे लोक इतके निर्लज्ज, मस्तवाल आहेत की दिल्लीतील कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी केली (Amol Mitkari criticize Governor ) नाही. मंगलप्रभात लोढाने देखील राजीनामा दिला नाही. हे जर असच सुरू राहील आणि आम्ही फक्त पाहत राहिलो तर आमच्या आगामी पिढ्या आम्हाला सोडणार नाहीत. अस देखील यावेळी मिटकरी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details