महाराष्ट्र

maharashtra

लाखोंचे सॅनिटरी साहित्य चोरणारे आरोपी जेरबंद, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

By

Published : Sep 25, 2021, 3:38 AM IST

जप्त मुद्देमाल व अटक आरोपींसह पोलीस पथक

लाखो रुपयांचे सॅनिटरी साहित्य चोरणाऱ्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एम छोटा टेम्पो आणि सॅनिटरी साहित्य, असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन चोरट्यांना व चोरीचे साहित्य खरेदी करणाऱ्या एकाला अटक केली आहे.


(पुणे) - लाखो रुपयांचे सॅनिटरी साहित्य चोरणाऱ्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एम छोटा टेम्पो आणि सॅनिटरी साहित्य, असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली असून पिंपळे गुरव येथील नाशिक फाटा येथे असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणाहून आरोपींनी साहित्य चोरी केले होते.

माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे

समीर छोटे अली खान (वय 23 वर्षे) आणि निहाल उर्फ फिरोज शेख, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याचबरोबर गुन्ह्यातील साहित्य विकत घेणाऱ्या रावसाहेब पंढरीनाथ सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर आणि निहाल हे दोघे ही पिंपळे गुरव येथील बांधकाम साईटवर काही महिन्यांपूर्वी काम करण्यास होते. मात्र, तिथे काम नसल्याने तिथून इतर ठिकाणी काम शोधण्यास गेले. परंतु, काही दिवसांनी तेथील बांधकामाच्या ठिकाणी जाताच तिथे टॉयलेटच्या भांड्यांसह इतर साहित्य त्याला दिसले. त्यांनी ते चोरी करण्याचे ठरवले. एके दिवशी त्यांनी एका छोट्या टेम्पोमधून 5-6 लाखांचे साहित्य चोरून नेले. ते इतर ठिकाणी नेऊन रावसाहेब पंढरीनाथ सूर्यवंशी यांना अवघ्या 80 हजारांमध्ये विकले. दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हे पिंपळे निलख परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काम नसल्याने त्यांनी हा चोरीचा उद्योग केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा -हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरला जाताना अडवून दाखवावे- किरीट सोमैय्या

ABOUT THE AUTHOR

...view details