महाराष्ट्र

maharashtra

गृहिणीने रांगोळीतून साकारली हुबेहूब पैठणी!

By

Published : Dec 5, 2019, 12:50 PM IST

विजयमाला उदय पाटील या गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साडी साकारली. लहानपणापासून विजयमाला यांना रांगोळीची आवड असल्याने त्या मागील अनेक वर्षांपासून रांगोळी काढत आहेत. मात्र, आपल्या कलेतून काहीतरी वेगळे करून दाखवण्याची त्यांना इच्छा होती.

रांगोळीतून साकारली हुबेहूब पैठणी
रांगोळीतून साकारली हुबेहूब पैठणी

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साडी साकारली आहे. विजयमाला उदय पाटील असे हा गृहिणीचे नाव आहे. नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद रांगोळीसाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी लागला.

रांगोळीतून साकारली हुबेहूब पैठणी

लहानपणापासून विजयमाला यांना रांगोळीची आवड असल्याने त्या मागील अनेक वर्षांपासून रांगोळी काढत आहेत. मात्र, आपल्या कलेतून काहीतरी वेगळे करून दाखवण्याची त्यांना इच्छा होती. विजयमाला यांनी काढलेली पैठणी रांगोळी पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत. शहरी भागात मोठी रांगोळी काढण्यासाठी जागा नसते. त्यामुळे विजयमाला यांनी घरातील हॉलमध्येच रांगोळी काढली आहे. पैठणी साडीचा फोटो पाहून त्यांनी रांगोळीतून हुबेहूब पैठणी साकारली.

हेही वाचा - ...तर आम्ही कायदा हातात घेऊ; पुण्यातील विद्यार्थिनींसह महिलांनी पंतप्रधानांना पाठवली १०० पत्रे

विजयमाला यांनी दहा किलो रांगोळी आणि पाच ते सहा रंगांचा वापर या रांगोळीसाठी केला आहे. ही सुरेख रांगोळी नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद आहे. मागील तीन दिवसांपासून नातेवाईक, शेजारी आणि मित्र परिवार रांगोळी पाहण्यासाठी पाटील यांच्या घरी येत आहेत. भविष्यात रांगोळीतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारण्याचा मानस विजयमाला यांनी व्यक्त केला आहे.

Intro:mh_pun_01_special_story_paithani_mhc10002Body:
mh_pun_01_special_story_paithani_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमध्ये एका गृहिणीने रांगोळीतून हुबेहूब पैठणी साकारली आहे. यासाठी त्यांना तीन दिवस मेहनत घ्यावी लागली आहे. विजयमाला उदय पाटील असे हा गृहिणीचे नाव आहे. लहानपणापासून विजयमाला यांना रांगोळीची आवड होती. त्या गेल्या अनेक वर्षपासून लहान-लहान रांगोळी काढत आहेत. परंतु, त्यांना काहीतरी वेगळं करू दाखवण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी रांगोळीतून पैठणी साकारली आहे. पैठणी पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या विजयमाला उदय पाटील या गृहिणी आहेत. त्यांना रांगोळी काढण्याचा छंद असून त्या प्रत्येक दिवशी मिळेल त्या वेळेत रांगोळी चा छंद जोपासतात. खर तर शहरी भागात मोठ्या रांगोळी काढण्यास जागा नसते. त्यामुळे विजयमाला यांनी चक्क घरातील हॉलमध्येच रांगोळी काढली आहे. नेमकं आपण काय करायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. गालीचा की पैठणी या पैकी काय साकारायच समजत नव्हतं. परंतु, शेवटी पैठणी चा फोटो पाहून त्यांनी हुबेहूब रांगोळीतून पैठणी साकारली. गेल्या तीन दिवस झालं मिळेल त्या वेळेत त्यांनी रांगोळीतून पैठणी काढली आहे.

विजयमाला यांनी दहा किलो रांगोळी आणि पाच ते सहा रंग या रांगोळीसाठी वापरले आहेत. नऊ फूट लांब आणि साडेचार फूट रुंद अशी सुंदर आणि सुरेख रांगोळी त्यांनी साकारली आहे. गृहिणी विजयमाला यांनी हॉलमध्येच रांगोळी साकारल्याने मात्र, घरच्यांची अडचण झाली आहे. सर्वांना फॅन लावणे आणि गॅलरीच्या खिडक्या उघडण्यास मज्जाव त्यांनी केला होता. हॉलमध्ये येऊ नका, व्यस्थित या अस पत्नी विजयमाला यांचं ऐकावं लागत होतं असं उदय पाटील हसून सांगतात. गेल्या दिन दिवसांपासून नातेवाईक, शेजारी आणि मित्र परिवार हे रांगोळी पाहण्यास येत आहेत. पाहण्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यात ही रांगोळी नसून हुबेहूब पैठणी असल्याचे भासते आहे अश्या प्रतिक्रिया मिळत आहात अस विजयमाला म्हणाल्या. भविष्यात विजयमाला यांना रांगोळीतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारायचा मानस आहे. Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details