महाराष्ट्र

maharashtra

Family Suicide in Pune District : पुणे जिल्हा हादरला! मुलाची 'ती' एक चूक; कुटुंबाने संपवले जीवन

By

Published : Jan 24, 2023, 10:17 PM IST

Updated : Jan 24, 2023, 10:33 PM IST

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात सलग मृतदेह आढळून येत होते. आज मंगळवार (दि. 24 जानेवारी)रोजी सर्व मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकाच कुटुंबातील सात जणांनी यामध्ये आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

माहिती देताना पोलीस अधिकारी

पुणे : या आत्महत्येत पन्नास वर्षांच्या आजोबांपासून तीन वर्षांच्या नातवाचा समावेश आहे. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. यात मोहन उत्तम पवार (वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार ( वय 45 वर्षे, दोघे रा. खामगांव ता. गेवराई) त्यांचे जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी शामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) शामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू शामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत.

महिलेला घरी सोडवण्यासाठी एक दिवसाचा कालावधी दिला होता : या एकच कुटुंबातील सर्वांनी आत्महत्या करण्याचे कारण आता समोर येत आहे. पवार यांच्या मुलाने विवाहित महिला पळवून घेऊन गेला होता. मात्र, या महिलेला घरी घेण्यास पवार कुटुंबीयांनी विरोध केला, त्या महिलेला तिच्या घरी सोडून ये. आपण आपल व्यवस्थित राहू, या महिलेला घरी सोडवण्यासाठी एक दिवसाचा कालावधी देखील दिला होता. जर तू या महिलेला घरी सोडवले नाही तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू, असा दम देखील कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाला दिला होता. मात्र, पवार यांच्या मुलाने गोष्ट एकली नाही आणि या कुटुंबातील सात जणांनी भीमा नदीत उडी मारून आत्महत्या हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मोहन पवार हे आपल्या कुटुंबीयांसोबत निघोज ( ता. पारनेर ) येथे मागील एक वर्षांपासून मजुरीचे काम करत होते.

कुटुंबाने हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचे समोर आले : दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. मोहन पवार यांना दोन मुले आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळून आणली. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले होते. या दोघांनी विवाहित मुलीला 24 तासात सोडून येण्यास सांगितले होते. यामुळे आपल्या इज्जत जाईल, नाहीतर आम्ही सर्वजण विष पितो किंवा जीव तरी देतो अशा प्रकारचा इशारा मोहन पवार यांनी दिला होता. मात्र, मुलाने हे ऐकले नाही आणि कुटुंबाने हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :पत्नीसोबत मित्राचे संबंध पाहून 'त्याने' स्वत:ला संपवले

Last Updated : Jan 24, 2023, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details