महाराष्ट्र

maharashtra

थरारक..! पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार, व्यावसायिक जखमी

By

Published : Oct 12, 2020, 7:20 PM IST

जखमी मयुर हांडे यांचा बांधकामासाठी वाळू पुरवण्याचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर हांडे हे श्रीराम चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये हांडे जखमी झाले.

पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार
पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार

पुणे- वाळू व्यावसायिकावर गोळ्या झाडल्याची घटना वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत आज दुपारच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एक व्यावसायिक जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मयूर हांडे (वय ३२) असे जखमी व्यावसायिकाचे नाव आहे.

पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार

मयूर हांडे यांचा बांधकामासाठी वाळू पुरवण्याचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडे हे श्रीराम चौकातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये हांडे जखमी झाले. त्याना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वानवडी पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदिवसा गोळ्या घालून एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

हेही वाचा-वाढीव लाईट बिलचे सत्र थांबता थांबेना; पुण्यातील एका कुटुंबाला तब्बल 47 हजारांहून अधिक बिल

ABOUT THE AUTHOR

...view details