महाराष्ट्र

maharashtra

Pune Minor Girl Rape Case : 15 वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा वारंवार बलात्कार

By

Published : Aug 8, 2022, 1:06 PM IST

पुण्यात एका 15 वर्षीय मुलीवर (A 15 year old girl) शेजाऱ्याने (by a neighbor) वारंवार बलात्कार (repeatedly raped) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

girl  raped
15 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे:गुलटेकडी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागातील एका नराधमाने 15 वर्षीय मुलीला धमकावत तीच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. ती घरी परतली आणि कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि त्याने तीच्यावर धमकावून बलात्कार केला. येवढेच नाही तर जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने पीडितेला मुंबईमध्ये डांबुन ठेवत तेथेही असाच प्रकार केल्याची बाब उजेडात आली आहे.

मुलीच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) दिलेल्या तक्रारीनुसार त्या नराधम शेजाऱ्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला गेला. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पीडीतेला वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुलीने सांगितले की, तिच्या शेजारी तिच्यावर वारंवार बलात्कार करत होता, त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली.

Hinganghat Crime : आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details