महाराष्ट्र

maharashtra

Zoo Authority Animal Deaths : राज्यातील 56 प्राणी संग्रहालयातील 200 प्राण्यांचा मृत्यू , पुण्याचा क्रमांक तिसरा

By

Published : Dec 1, 2021, 10:36 PM IST

Updated : Dec 2, 2021, 12:48 PM IST

प्राणी संग्रहालय
प्राणी संग्रहालय

णीसंग्रालयामध्ये वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवासापेक्षाही अधिक उत्तम वातावरणात ठेवण्यात येत असल्याचा दावा नेहमीच प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र, असे असले तरी प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 56 प्राणी संग्रहालयातील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा तिसरा क्रमांक आहे.

पुणे- प्राणी संग्रहालयात वन्यप्राण्यांना नैसर्गिक अधिवासापेक्षाही अधिक उत्तम वातावरणात ठेवण्यात येत असल्याचा दावा नेहमीच प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र, असे असले तरी प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांचे दगावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातील 56 प्राणी संग्रहालयातील तब्बल 200 प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा तिसरा क्रमांक आहे.

2019-2020 सेंट्रल झू अॅथॉरिटीचा अहवाल

देशात 513 तर महाराष्ट्रात 56 प्राणिसंग्रहालय आहेत. या प्राणी संग्रहालयामध्ये हजारो प्राणी आहेत. या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थेबाबतचा अहवाल दरवर्षी सादर करण्यात येतो. 2019-2020 चा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालातून महाराष्ट्रातील संग्रहालयाचे वास्तव समोर आले आहे.

राणीच्या बागेत सर्वाधिक प्राण्यांचे मृत्यू

या अहवालानुसार मुंबई येथील जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक 67 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ वर्ध्यातील 'पीपल्स फॉर ॲनिमल' या प्राणी संग्रहालयाचा नंबर आहे. या ठिकाणी 53 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या वर्षभरात 35 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू हरणांचे

या अहवालानुसार सर्वाधिक मृत्यू हे हरणांचे झाल्याचे समोर आले आहे. या हरणांच्या मृत्यूला हृदय विकाराचा झटका कारणीभूत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. हरण हा भित्रा प्राणी असल्यामुळे त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्याचबरोबर प्राण्यांचे वय त्यांना झालेल्या जखमा आणि त्यावर ती झालेला जिवाणूंचा संसर्ग हा देखील प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मार्गदर्शक सूचनांचा वापर करून प्राण्यांची देखभाल

'सेंट्रल झू अॅथॉरिटी'ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राण्यांची देखभाल प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडून करण्यात येते. त्यांच्या आहाराचे व्यवस्थापन करून त्यांना पौष्टीक आहार आवश्यक प्रमाणात देणे, त्यांचे लसीकरण करणे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची वारंवार तपासणी करणे. या प्रकारची सर्व काळजी प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडून करण्यात येत असल्याची माहिती राजीव गांधी प्राणी संग्रहालय संचालक राजकुमार जाधव यांनी दिली.

हे ही वाचा-IMD Weather Alert Rains : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, 3 दिवस सरी कोसळणार

Last Updated :Dec 2, 2021, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details