महाराष्ट्र

maharashtra

परभणीचे सेना आमदार राहुल पाटील यांना पुन्हा उमेदवारी; घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मिळाला एबी फॉर्म

By

Published : Sep 30, 2019, 8:35 AM IST

परभणी मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे युती झाली तरी ही जागा शिवसेनेच्या पारड्यात जाणार, हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेत उमेदवारीवरून कुठलीही स्पर्धा नाही. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून यापूर्वीच प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे.

आमदार राहुल पाटील

परभणी - अद्याप राज्यातील शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली नसली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या विद्यमान आमदारांना आणि खात्रीच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. यात परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांना मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले.

हेही वाचा - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार; प्रचाराचा फोडणार नारळ

परभणी मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे युती झाली तरी ही जागा शिवसेनेच्या पारड्यात जाणार, हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेत उमेदवारीवरून कुठलीही स्पर्धा नाही. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून यापूर्वीच प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे.

दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत परभणी विधानसभेत शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात उतरले होते. शिवाय एमआयएमचा उमेदवार देखील तगडा होता. अशा परिस्थितीसुद्धा शिवसेनेने या ठिकाणी आपली जागा कायम राखली. परंतु शिवसेनेला भाजपच्या उमेदवाराला तोंड देताना थोडीशी दमछाक झाली ोहती. यावेळी मात्र युती होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेला या वेळी काँग्रेसच्या उमेदवाराला तोंड द्यावे लागणार आहे.

हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : 'बाबरी'नंतर हिंदूत्वादी राजकारण.. मुंबई बॉम्बस्फोट मालिका अन् मराठवाडा नामांतर आंदोलन

परंतु असे असले तरी भाजपचे गतवेळीचे उमेदवार आनंद भरोसे यंदादेखील इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी देखील केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपले आणि आमदार डॉ.राहुल पाटील यांचे जमत नाही, त्यामुळे त्यांचे काम कसे करायचे ? असा सवाल देखील उपस्थित केला होता. मात्र, युती जाहीर झाल्यास ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले. त्यामध्ये आमदार पाटील यांना देखील उमेदवारीसाठी लागणारा एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेमकी काय राजकीय परिस्थिती निर्माण होते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्द ठेवेल- आमदार पाटील

मातोश्रीवर बोलावून घेत परभणी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा एबी फॉर्म देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून परभणीकरांच्या आशीर्वादाच्या जोरावर हा बालेकिल्ला कायम ठेवेल, अशी प्रतिक्रिया उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे.

Intro:परभणी - अद्याप राज्यातील शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली नसली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांच्या विद्यमान आमदारांना आणि खात्रीच्या उमेदवारांना आज एबी फॉर्मचे वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. यात परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांना मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देऊन कामाला लागण्याचे आदेश दिले.Body:परभणी मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून
शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे युती झाली तरी ही जागा शिवसेनेच्या पारड्यात जाणार, हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेत उमेदवारीवरून कुठलीही स्पर्धा नाही. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून यापूर्वीच प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत परभणी विधानसभेत शिवसेना-भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात उतरले होते. शिवाय एमआयएमचा उमेदवार देखील तगडा होता. अशा परिस्थितीसुद्धा शिवसेनेने या ठिकाणी आपली जागा कायम राखली; परंतु शिवसेनेला भाजपच्या उमेदवाराला तोंडे का देताना थोडीशी दमछाक झाली, हे मात्र तितकच खरं आहे. यावेळी मात्र युती होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिवसेनेला या वेळी काँग्रेसच्या उमेदवाराला तोंड द्यावे लागणार आहे.
परंतु असे असले तरी भाजपचे गतवेळीचे उमेदवार आनंद भरोसे यंदादेखील इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून तयारी देखील केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपले आणि आमदार डॉ.राहुल पाटील यांचे जमत नाही, त्यामुळे त्यांचे काम कसे करायचे ? असा सवाल देखील उपस्थित केला होता. मात्र युती जाहीर झाल्यास ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले. त्यामध्ये आमदार पाटील यांना देखील उमेदवारीसाठी लागणारा एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नेमकी काय राजकीय परिस्थिती निर्माण होतेे याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

"शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्द ठेवेल- आमदार पाटील"

"मातोश्रीवर बोलावून घेत परभणी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा एबी फॉर्म देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांनी आज पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी सोपवली आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकील्ला असून परभणीकरांच्या आशिर्वादाच्या जोरावर हा बालेकील्ला अभेद्दच ठेवील", अशी प्रतिक्रिया उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत - फोटो :- परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details