महाराष्ट्र

maharashtra

परभणीत शिवसेना आक्रमक, भाजप जिल्हाध्यक्षावर ठोकणार ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

By

Published : Jun 18, 2019, 10:14 PM IST

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. भरोसे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांना चोर आणि गद्दाराची उपमा दिली होती.

परभणी शिवसेना पत्रकार परिषद

परभणी- शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. भरोसे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांना चोर आणि गद्दाराची उपमा दिली होती. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

परभणीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद

आनंद भरोसे यांनी आधी पंचायत समितीची निवडणूक जिंकून दाखवावी आणि मग आमदारासारख्या व्यक्तीवर आरोप करावेत, अशी टीकाही शिवसेनेने केली. यासंदर्भात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर व माजी जिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गंगाप्रसाद आनेराव यांच्यासह परभणी विधानसभात मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंगळवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी बोलताना नावंदर म्हणाले, प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांना काही संवैधानिक अधिकार असतात. त्यानुसारच ते विकासकामांचे उद्घाटन करतात. तेव्हा त्यांना चोर म्हणणे योग्य नाही, याबद्दल आम्ही आनंद भरोसे यांचा निषेध करतो. आनंद भरोसे यांना हे शोभणारे नसून त्यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता.

गंगाप्रसाद आनेराव यांनीही अत्यंत तिखट शब्दात आनंद भरोसे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ज्यांची लायकी पंचायत समितीला निवडून यायची नाही, ते आमदारासारख्या व्यक्तिमत्त्वावर आरोप करत आहेत. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ४ तास आधी भाजपमध्ये आलेले आनंद भरोसे हे काँग्रेसचे बांडगुळ आहेत. येणाऱ्या काळात ते जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झाले तर आश्चर्य वाटायला नको. काँग्रेस विचारसरणीच्या आनंद भरोसे यांना भाजप-शिवसेना युतीशी काही घेणे देणे नाही त्यांना युतीची संस्कृतीच माहीत नाही, त्यामुळे ते अशा प्रकारची बडबड करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आनंद भरोसे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल आमदार राहुल पाटील यांच्या वतीने ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे. शिवाय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे देखील आनंद भरोसे यांची तक्रार करण्यात येणार असल्याचे आनेराव यांनी शेवटी सांगितले.

Intro:परभणी - येथील शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी काही दिवसांपूर्वी चोर आणि गद्दाराची उपमा दिली होती. यास आज मंगळवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार उत्तर दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आनंद भरोसे यांनी आधि पंचायत समितीची निवडणूक जिंकून दाखवावी आणि मग आमदार सारख्या व्यक्तीवर आरोप करावेत. त्यांच्या या बिनबुडाच्या आणि बेताल वक्तव्याबद्दल आमदार राहुल पाटील हे पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.


Body:यासंदर्भात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर व माजी जिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गंगाप्रसाद आनेराव यांच्यासह परभणी विधानसभेत मतदार संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्यावतीने मंगळवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी बोलतांना नावंदर म्हणाले, प्रत्येक मतदार संघातल्या आमदारांना काही संविधानिक अधिकार असतात. त्यानुसारच ते विकासकामांचे उद्घाटन करतात. तेव्हा त्यांना चोर म्हणणे योग्य नाही, याबद्दल आम्ही आनंद भरोसे यांचा निषेध करतो. आनंद भरोसे यांना हे शोभणारे नसून त्यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा होता. तसेच यानंतर गंगाप्रसाद आनेराव यांनी अत्यंत तिखट शब्दात आनंद भरोसे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ज्यांची लायकी पंचायत समितीला निवडून यायचे नाही, ते आमदार सारख्या सारख्या व्यक्तिमत्त्वावर आरोप करत आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चार तास आधी भाजपमध्ये आलेले आनंद भरोसे हे काँग्रेसचे बांडगुळ आहेत. येणाऱ्या काळात ते जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झाले तर आश्चर्य वाटायला नको. काँग्रेस विचारसरणीच्या आनंद भरोसे यांना भाजप-शिवसेना युतीशी काही घेणेदेणे नाही त्यांना युतीची संस्कृतीच माहित नाही, त्यामुळे ते अशा प्रकारची बडबड करत आहेत. आनंद भरोसे यांच्या बेताल वक्तव्याबद्दल आमदार राहुल पाटील यांच्या वतीने पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येणार आहे शिवाय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे देखील आनंद भरोसे यांची तक्रार करण्यात येणार असल्याचे आणि राव यांनी शेवटी सांगितले.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत press byte.


Conclusion:बीज

ABOUT THE AUTHOR

...view details