महाराष्ट्र

maharashtra

साई जन्मभूमीला पाठिंबा देण्यासाठी सेलू येथून पायी दिंडी यात्रा

By

Published : Feb 8, 2020, 10:04 PM IST

साई जन्मभूमीला पाठिंबा म्हणून साईबाबांच्या गुरु स्थानापासून(सेलू) जन्मस्थान असलेल्या पाथरीपर्यंत 24 किलोमीटरची सर्वपक्षीय पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीचे नेतृत्व सेलू-जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर करणार आहेत.

पाथरी साईबाबा मंदिर
पाथरी साईबाबा मंदिर

परभणी - पाथरीकरांकडे साई जन्मभूमी संदर्भात 29 पुरावे आहेत, असे त्यांचे म्हणने आहे. त्या प्रमाणेच सेलू येथील व्यंकुशा अर्थात बाबासाहेब महाराज मंदिर संस्थांकडेसुद्धा साईबाबा आणि बाबासाहेब महाराज यांच्या गुरु-शिष्य नात्या संदर्भात 22 ठोस पुरावे आहेत. त्यामुळे जन्मभूमीला पाठिंबा म्हणून साईबाबांच्या गुरु स्थानापासून(सेलू) जन्मस्थान असलेल्या पाथरीपर्यंत 24 किलोमीटरची सर्वपक्षीय पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे. या दिंडीचे नेतृत्व सेलू-जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर करणार आहेत.

साई जन्मभूमीला पाठिंबा देण्यासाठी पायी दिंडी यात्रा


साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी आहे हे त्रिवार सत्य आहे. हे सिद्ध करण्यासाठी कोणाच्या शिफारशींची गरज नाही. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. पाथरीचे साईबाबा आणि सेलू येथील बाबासाहेब महाराज यांचे गुरू-शिष्याचे नाते देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे बाबासाहेब महाराजांच्या मंदिरातून सर्वपक्षीय दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 वाजता ही यात्रा मंदिरातून प्रारंभ होणार आहेत, बोर्डीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली. यावेळी बाबासाहेब महाराज मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. बोर्डीकर यांनी दिली.

हेही वाचा- ' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'

चोवीस किलोमीटरच्या प्रवासात हजारो महिला, पुरुष सहभागी होतील. या शिवाय घोडेस्वार, उंटस्वार, भजनी मंडळ देखील सहभागी होणार आहे. साई जन्मस्थळा संदर्भाचे जे 29 पुरावे आहेत, त्या पुराव्यांचा देखावा या दिंडीत सादर केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिरात आरती करण्यात येणार आहे, असेही आमदार बोर्डीकर यांनी सांगितले.

सोनपेठ येथूनही दिंडी -
सोनपेठ तालुक्यातून देखील साईभक्त सायकल दिंडी काढणार आहेत. रविवारी सायंकाळी सेलूच्या दिंडी यात्रेत ते सहभागी होणार आहेत. एकूणच साईबाबा जन्मस्थळाच्या मुद्द्यावरून संपूर्ण परभणी जिल्ह्यात साईभक्त आक्रमक होताना दिसत आहेत.

Intro:परभणी - पाथरी येथील साई जन्मभूमी संदर्भात पाथरी येथील नागरिकांकडे तब्बल 29 पुरावे आहेत. त्याप्रमाणेच साईबाबांचे गुरु असलेल्या सेलू येथील व्यंकुशा अर्थात बाबासाहेब महाराज मंदिर संस्थांकडे सुद्धा साईबाबा आणि बाबासाहेब महाराज यांच्या गुरु-शिष्य नात्या संदर्भात 22 ठोस पुरावे आहेत. त्यामुळे जन्मभूमीला पाठिंबा म्हणून साईबाबांच्या गुरु स्थानापासून जन्मस्थान असलेल्या पाथरी इथपर्यंत उद्या रविवारी 24 किलोमीटर ची पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे.Body:ही पायीदिंडी सर्वपक्षीय असून या दिंडीचे नेतृत्व सेलू-जिंतूर मतदार संघाचे आमदार मेघना बोर्डीकर करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी बाबासाहेब महाराज मंदिर संस्थानचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार मेघना बोर्डीकर म्हणाले, साईबाबा जन्मस्थळ हे पाथरी आहे हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे साईबाबा यांचे जन्मस्थान हे सिद्ध करण्यासाठी कोणाच्या शिफारशींची गरज नाही. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. तसेच पाथरीचे साईबाबा आणि सेलू येथील बाबासाहेब महाराज यांच्या गुरू-शिष्याचे नाते देखील तेवढेच सत्य आहे. त्यामुळे बाबासाहेब महाराजांच्या मंदिरातून सर्वपक्षिय दिंडी यात्रा काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 वाजता ही यात्रा मंदिरातून प्रारंभ होणार आहे. चोवीस किलोमीटरच्या प्रवासात हजारो महिला, पुरुष सहभागी होतील. शिवाय घोडेस्वार, उंटस्वार, भजनी मंडळ देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे साई जन्मस्थळ संदर्भाचे जे 29 पुरावे आहेत, त्या पुराव्यांचा देखावा सुद्धा आम्ही या दिंडीत सादर करणार आहोत, त्यानंतर सायंकाळी पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिरात आरती करण्यात येणार आहे. याठिकाणी साईबाबा जन्मस्थळ मंदिर समितीचे पदाधिकारी आणि साईभक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील, असेही आमदार बोर्डीकर म्हणाल्या.

सोनपेठ येथूनही दिंडी

दरम्यान, सोनपेठ तालुक्यातून देखील साईभक्त सायकल दिंडी काढणार आहेत. सेलूच्या दिंडी यात्रेत ते देखील सायंकाळी सहभागी होऊन साईबाबा जन्मस्थळ मंदिरात महाआरती करणार आहेत. एकूणच साईबाबांच्या जन्मस्थळ मंदिर मुद्द्यावरून संपूर्ण परभणी जिल्ह्यात साईभक्त आता आक्रमक होताना दिसत आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_meghna_bordikar_byte_on_saibaba_foot_dindi
Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details